तपस्वी

विश्व सारे मोकळे जोडीत जातो,
बंध माझे मी असे तोडीत जातो


लागला तो छंद, त्याला शोधतो मी,
पावलांच्याही खुणा खोडीत जातो
 
शिस्त 'त्याची' फक्त आता यास ठावे,
रीत यांची येथली मोडीत जातो
 
माणके झोळीत आपल्या अशी ती,
नेसली 'वस्त्रे' इथे सोडीत जातो
 
प्रस्थ त्यांचे, पाघळावे ज्ञान त्यांनी!
मी तपस्वी बापडा गोडीत जातो!


-निलेश सकपाळ

गझल: