सोने
सोने
अघटित घडले त्या बाजारी जेव्हा पडले सोने
शेती फुलले , जमिनीमध्ये आहे दडले सोने!
जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने?
कळेल का मज असे कोणत्या मुशीत घडले सोने?
निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक-
आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने!
चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने
अंधार्या रात्री एकाकी हळूच रडले सोने
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने
गझल:
प्रतिसाद
Sunil Deshmukh
शनि, 05/07/2008 - 15:41
Permalink
निघून गेली
निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक-
आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने!
क्या बात ... अतिशय सुंदर
प्रेत्येक शेर आवडला
सुनिल देशमुख
आनन्द मनातला (not verified)
रवि, 06/07/2008 - 20:00
Permalink
निघून गेली
निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक-
आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने
छान !!!
मनाला भावली तुमची गझल
प्रत्येक शेर उत्तम आहे
मानस६
शनि, 12/07/2008 - 16:06
Permalink
मतला..
चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने
अंधार्या रात्री एकाकी हळूच रडले सोने
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे -
कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने .. हे दोन्ही शेर आवडलेत
मतल्याचा अर्थ नीटसा कळला नाही.....
जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने?.. इथे वृत्त जरासे गडबडले आहे..('तसेच' हाशब्द जास्तीचा आहे बहुदा)..कृपया जाणकारांकडुन खातर जमा करुन घेणे
-मानस६