'वस्ती'

वागणे माझे खरे होते;
हे जगासाठी बरे होते.


भाळलो मी फक्त पाण्यावर;
भोवताली भोवरे होते.


सांगणे मी सोडले देवा;
देव सारे घाबरे होते.


जाळली ज्यांनी उभी वस्ती;
शांत त्यांचे चेहरे होते.


पाळली नाही कधी साधे;
श्वान घरचे चावरे होते.


वारही केले असे त्यांनी;
हात दोन्ही पांढरे होते.


कोरडे जमले न काहीही;
अंतरी माझ्या झरे होते.


                -अभिषेक घ. उदावंत
         संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला.


 

गझल: 

प्रतिसाद

अंतरी माझ्या झरे होते.
सुंदर !!

मक्ता खासच आहे. एकंदर गझल छोटा बहर सांभाळून अर्थवाही!
शुभेच्छा.


जयन्ता५२