रस्ता
जो सुचला तो धरला रस्ता
माझा नक्की कुठला रस्ता ?
चौकाशी छाटण्यात गप्पा
तो बघ, तिकडे रमला रस्ता
ज्याने तुझियापाशी नेले
मजला तो आवडला रस्ता
टाळ, मृदुंगाच्या नादाने
वारीचा दुमदुमला रस्ता
प्रवास जेव्हा संपुनी गेला
कळले, सारा चुकला रस्ता
गझल:
प्रतिसाद
पुलस्ति
शुक्र, 09/05/2008 - 01:44
Permalink
छान
मतला आणि शेवटचा शेर आवडले!
जयन्ता५२
शुक्र, 09/05/2008 - 08:46
Permalink
मस्त!
मतला, मक्ता दोन्ही शेर मस्त जमलेत!
शुभेच्छा!
जयन्ता५२
अनंत ढवळे
शुक्र, 09/05/2008 - 21:14
Permalink
सुंदर !
प्रवास जेव्हा संपुनी गेला
कळले, सारा चुकला रस्ता
सुंदर !
केदार पाटणकर
मंगळ, 13/05/2008 - 15:16
Permalink
धन्यवाद
धन्यवाद सर्वांना...
ॐकार
शुक्र, 16/05/2008 - 01:23
Permalink
ज्याने
तुझियापाशी नेले... हा शेर आवडला.
केदार पाटणकर
शुक्र, 28/05/2010 - 11:08
Permalink
नवा शेरः फुटले फाटे बरेच पण
नवा शेरः
फुटले फाटे बरेच पण मी-
मनात माझा जपला रस्ता