मजबुरीने

खूप काही सहन करतो मजबुरीने....
मजबुरीचा राग येतो मजबुरीने....


तेच जगणे तेच मरणे जीवनाचे
हेच गाणे रोज गातो मजबुरीने


प्रेम करतो मी तुझ्यावर एवढे की,
की , तुझा मग राग येतो मजबुरीने


जिंकलो कित्येक मी  मोठ्या लढाया
पण तुझ्याशी सहज हरतो मजबुरीने


हौस मृत्यूची  इथे आहे कुणाला
शेवटी माणूस मरतो मजबुरीने


देह - विक्री अन खरेदी  भूक आहे
प्रश्न साधा कठिण बनतो मजबुरीने
                            
                                 -अभिषेक घ. उदावंत
                         संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला.


 

गझल: 

प्रतिसाद

हौस मृत्यूची  इथे आहे कुणाला
शेवटी माणूस मरतो मजबुरीने
सुंदर  शेर !

हौस मृत्यूची  इथे आहे कुणाला
शेवटी माणूस मरतो मजबुरीनेसुंदर  शेर !

असेच. सुंदर शेर..

मजबुरि नको आहे, नितळ, स्वच्छ जगता येणार नाहि का?
जरा स्वच्छन्द, उडनार्या रान पाखरा साऱ़़़ख, जन्मलेल्य बाळाच्य रडन्यसार्ख लिहा
बाकि मस्त