आलीस पावसाची...

आलीस पावसाची, भिजवीत पावसाला
आली मशाल कैसी , जाळीत पावसाला !


भर पावसात पडले उन कोवळे जरासे
आले जसे किरण हे माळीत पावसाला ।


पदरात झाकले तू लावण्य मुक्त जैसे
हळुवारश्या रुपेरी कल्हईत पावसाला ।


घोटात राख वाटा तू कोरड्या गळ्यांचा
कवितेत काय बसला पोशीत पावसाला !


चिक्कार झाली झाडे,चिक्कार झाली शहरे
प्रगतीस ओघ आला, विझवीत पावसाला ।


'है हिम्मते खुदा तो',पिकवून दाव बागा
वाचीत काय बसला राशीत पावसाला !


अंगाई गात वारा, सोडून आज मस्ती
धारांमधून जातो निजवीत पावसाला ।


थंडी गुलाब झाली,भिजला दवात वारा
चल ये मिटून घेऊ दुलईत पावसाला । 


पाण्यास काय झाले ,का नाचल्या त्सुनामी
वरचेवरी  भयाने  गोठीत पावसाला ।

गझल: 

प्रतिसाद

नाही आवडली  ही रचना, मनीषा. 
खूपच संदिग्ध, मोघम,  अनाकलनीय झाली आहे ....
गझल लिहिताना घाई उपयोगाची नाही.  अनेक विचार, कल्पना मुरवत ठेवायच्या असतात  :)
 
 

वा! मनिषा सर्व कल्पना आवडल्या.
मक्ताची कल्पना स्पष्ट वाटली नाही. ( कदाचित मला विषयाची फारशी माहिती नसावी)