राख..!


अता रात्र नाही गंधाळलेली..
उरी चंद्रकोरी कवटाळलेली..


तरीही बहर निशिगंधास येतो
नजर मात्र त्याची ओशाळलेली..


सखे शब्द होते कविता सहेली
अता फक्त पाने चुरगाळलेली..


पुन्हा एकटा मी उरतो किनारी
पुन्हा लाट येते फ़ेसाळलेली..


जरा थांब मरणा सोबत तुझ्या घे
मला जिंदगीही कंटाळलेली..


किती जाळण्याची केलीत घाई
तरी राख मागे रेंगाळलेली..!


–--   अभिजीत दाते

गझल: 

प्रतिसाद

पुन्हा एकटा मी उरतो किनारी
पुन्हा लाट येते फ़ेसाळलेली..
छान!!

मला एकंदर द्विपदींत संदिग्धता बरीच वाटली. उदा: निशिगंधाचा शेर'कविता सहेली' मराठीत कसेसच वाटते. आणि  वृत्त निवडताना काळजी घ्यावी. गझल सहज गुणगुणता येईल, लयीत वाचता येईल असे वृत्तअसल्यास उत्तम..