केले जुलूम ....
केले जुलूम ज्यांनी, त्यानाच राहवेना
ते सांत्वनास आले, मज हास्य आवरेना
उचलून पापण्यांना, मी पाहिलेच नाही
ना-पाहणेच माझे, कोणास पाहवेना
ऐकून घेतले मी, ते बोल दांभिकांचे
बसलो अबोल, तेही कोणास साहवेना
इतिहास पाठ ह्यांना, माझ्या पराभवाचे
जयगान आजचे पण, कोणास आठवेना
आम्ही परस्परांचे, हे जाणतो बहाणे
पण खेळ रंगलेला. कोणास मोडवेना
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 18/04/2007 - 11:21
Permalink
सुंदर गझल
ऐकून घेतले मी, ते बोल दांभिकांचे
बसलो अबोल, तेही कोणास साहवेना
सुंदर गझल. सगळेच शेर आवडले.
सत्यन्जय
बुध, 18/04/2007 - 13:23
Permalink
अप्रतिम गझल
डबीर जी,
अप्रतीम गझल, शेवटचा शेर खुपच भावला. पुढच्या गझलेची वाट पहातो.
सत्यन्जय
मिलिंद फणसे
बुध, 18/04/2007 - 14:44
Permalink
सुंदर
सुंदर गझल.
बसलो अबोल, तेही कोणास साहवेना
यावरून
"उनको ये शिकायत है के हम कुछ नहीं कहते
अपनी तो ये आदत है के हम कुछ नहीं कहतें"
आठवले.
ॐकार
बुध, 18/04/2007 - 19:00
Permalink
मतला खास
मतला मस्त आहे. सारे शेर सहज आले आहेत. गझल आवडली.
कुमार जावडेकर
बुध, 18/04/2007 - 20:05
Permalink
वा!
वा डबीरसाहेब!
सुंदर गझल..
- केले जुलूम ज्यांनी त्यांनाच राहवेना ... अप्रतिम मिसरा आहे.
मतला अतिशय आवडला.
इतिहास/ जयगान, ना-पाहणेच माझे हे शेरही.
- कुमार
विसुनाना
बुध, 18/04/2007 - 20:09
Permalink
मजबूत
मजबूत गझल आहे. वा!
चक्रपाणि
गुरु, 19/04/2007 - 04:58
Permalink
वा! मस्त!
अप्रतिम गझल! सगळेच शेर आवडले.
अगस्ती
गुरु, 19/04/2007 - 16:21
Permalink
वा वा
वा वा,
सुंदर गझल. मतला खासच आहे.
---अगस्ती
मानस६
गुरु, 18/10/2007 - 23:24
Permalink
इतिहास पाठ ह्यांना, माझ्या पराभवाचे
इतिहास पाठ ह्यांना, माझ्या पराभवाचे
जयगान आजचे पण, कोणास आठवेना..सुंदर
-गझल आवडली
-मानस६