जगणे म्हणजे अवघड चळवळ
जगणे म्हणजे अवघड चळवळ
जीवनभरची तडफड तळमळ
पडणे उठणे कुणास चुकले
बघ झाडांची पडझड सळसळ
मी मेल्यावर तुला छळावी
या हृदयाची धडधड जळजळ
ज्यांना नाही काही धंदा
तयां आवडे धुळवड उठवळ
व्यर्थ न जावो कामी येवो
श्रीकांत तुझी बडबड कळकळ
गझल:
जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे