एकपात्री
ते कधी येणार नव्हते ही मला होतीच खात्री
मी सुरू केला अखेरी खेळ माझा एकपात्री
ठेवतो आहे स्वतःच्या जो घराचे नाव 'आई'
भोगले दारिद्र्य त्याची आश्रमला जन्मदात्री
आजही लोकात जेथे जात धर्माहून भांडण,
गाव ते बघुनी परतला फक्त वेशीतून यात्री
त्याच संस्था फक्त येथे सारख्या वादात दिसती,
लावती उद्घाटनाला हे जिथे नेतेच कात्री
चांदणे खांदेकरी अन् लाजरी पडद्यात स्वप्ने,
ही अशी येते निजेची पालखी दररोज रात्री
दशरथ नामदेव दोरके
सर्वे नं. ८, यशवंतनगर
येरवडा, पुणे ६
भ्रमणध्वनी ९३७११६९९७३
गझल:
प्रतिसाद
अनंत ढवळे
रवि, 02/03/2008 - 10:56
Permalink
छान
ही अशी येते निजेची पालखी दररोज रात्री
चांगली कल्पना!
चित्तरंजन भट
मंगळ, 04/03/2008 - 13:25
Permalink
शेवटचा शेर
दशरथ, शेवटचा शेर विशेष आवडला. एकंदर गझल छान. संकेतस्थळावर स्वागत आहे.