तरी हात हाती हवासा तुझा...

कुठे रहिला अर्थ श्वासा तुझा....
अरे... होत आहे उसासा तुझा....

खरे.. व्यर्थ वाटेल खोटे पुन्हा..
पुरे.. खूप झाला खुलासा तुझा..

चुकीची तुला भेटली बातमी.!!!
तरी छान होता.. दिलासा तुझा..

कुठे पाळला आजवर शब्द तू..
कसाकाय ठेवू भरोसा तुझा...

जरी ओळखीही नसे आपली..
तरी हात हाती हवासा तुझा...

अमित वाघ.
''गुरुमंदिर'', सुधीर कॉलनी. अकोला- ४४४००१.
मो. क्र. ९९२१६११६११; ९८५०२३९८८२.
www.gazalnavihotanna.blogspot.com

गझल: 

प्रतिसाद

मस्त रे बहोत खूब !!!!!!!  
खरे.. व्यर्थ वाटेल खोटे पुन्हा..
पुरे.. खूप झाला खुलासा तुझा..

  वा वा वा

मतला मस्तच! खुलासा शेरही धारदारपणामुळे आवडला. दिलासा आणि हवासा हे सुटे मिसरेही छान.  गझल आवडली अमित, अजून येऊ दे!
इतर किरकोळ मते - "बातमी भेटली" हे जरासे कानाना खटकले. "कुठे पाळला.." हा मिसरा आल्यानंतर "भरोसा तुझा" हे शब्द वाचण्याआधीच कळतात :) "ओळखही" च्या ऐवजी "ओळखीही" ही तडजोड टाळता आली असती तर छान झाले असते. चु.भू.दे.घे.

चुकीची तुला भेटली बातमी.!!!
तरी छान होता.. दिलासा तुझा

चांगला शेर ! 

चुकीची तुला भेटली बातमी.!!!
तरी छान होता.. दिलासा तुझा..
वाव्वा!! छान गझल!!!

भेटणे हे क्रियापद विदर्भात/वऱ्हाडात मिळणे ह्या क्रियापदासारखेदेखील वापरतात, असे वाटते.  थोडक्यात भेटली म्हणजे मिळाली.

आणि भरोसा (भरवसा?) फार आवडले. छोट्या बहरातली गझल चांगली झालीये.
शुभेच्छा.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

मर्यादीत नागरी भाषासंस्कारांमुळे असे कंगोरे माझ्या लक्षात येत नाहीत. क्षमस्व आणि धन्यवाद!

मर्यादीत नागरी भाषासंस्कारांमुळे असे कंगोरे माझ्या लक्षात येत नाहीत. क्षमस्व आणि धन्यवाद!
पुलस्ति साहेब, ह्याची खरे तर गरज नव्हती. तुम्हाला ते खटकणे साहजिक होते. माझ्या मते, काही खटकले तर विचारल्यास उत्तम. वाचकांना नव्या गोष्टी,कंगोरे कळण्यास आणि कवीलाही शब्द निवडताना मदत होऊ शकते.