फासले ऐसे भी होंगे - भावानुवाद - असेल अंतर असेही...

मूळ गझल

फासले ऐसे भी होंगे.......ये कभी सोचा ना था .....
सामने बैठा था मेरे.....और वो मेरा न था!!!!!!

वो की ख़ुशबू की तरह.....फैला था मेरे चार सू......
मैं उसे महसूस कर सकता था......छू सकता ना था.....

रात भर उस ही की आहट कान में आती रही......
....झाँक कर देखा गली में....कोई भी आया ना था......

अक्स तो मौजूद थे पर ..... अक्स तन्हाई के थे....
आइना तो था मगर उस में तेरा चेहरा ना था !!!!

आज उसने दर्द भी अपने अलहदा कर दिए.......
आज मैं रोया तो मेरे साथ वो रोया ना था !!!

ये सभी वीरानियां......उसके जुदा होने से थीं....
आँख धुंधलायी हुई थी.....शहर धुंधलाया न था!!!!!

याद करके और भी तक़लीफ होती थी "अदीम".......
भूल जाने के सिवा....अब कोई भी चारा ना था.....

- अदीम हाशमी

भावानुवाद

असेल अंतर असेही असा विचार साधा केला नव्हता
समोर माझ्या बसला होता पण तो काही माझा नव्हता

सुगंधापरी माझ्याभवती चहूकडे घमघमाट त्याचा
मला जाणवत होता निव्वळ, कुठेच तो स्पर्शाला नव्हता

केवळ त्याच्या हाका ऐकू येत राहिल्या मला रात्रभर
अनेकदा पाहिले मी, खरे कुणीच दारी आला नव्हता

उरली होती श्रांत आसवे - एकटेपणाची जी माझ्या
आणि आरसा-त्यातही मला तुझा चेहरा दिसला नव्हता

आता त्याने त्याच्यापासून विभक्त केल्यात वेदनाही
आता मी रडले पण त्याच्या डोळ्यांना ओलावा नव्हता

कारण त्याचा विरह ठरावा सगळे काही ओस पडाया
धूसर होती नजर, गाव तो काळोखात बुडाला नव्हता

अदीम म्हणतो - तुला पुन्हा आठवून झाल्या किती वेदना
विसरून जावे ह्याच्याविपरित उपाय दुसरा उरला नव्हता

-ॐकार

प्रतिसाद


असेल अंतर असेही असा विचार साधा केला नव्हता
समोर माझ्या बसला होता पण तो काही माझा नव्हता
सुगंधापरी माझ्याभवती चहूकडे घमघमाट त्याचा
मला जाणवत होता निव्वळ, कुठेच तो स्पर्शाला नव्हता
केवळ त्याच्या हाका ऐकू येत राहिल्या मला रात्रभर
अनेकदा पाहिले मी, खरे कुणीच दारी आला नव्हता गुंतागुंतीवा! विशेषतः पहिल्या तीन शेरांचा भावानुवाद चांगलाच जमून आला आहे. नंतरच्या शेरांतले प्रतिमाविश्वे किंवा कल्पना कदाचित गुंतागुतीच्या असल्यामुळे एवढी सफाई आली नसावी, असे मला वाटले.  स्पर्शाला नसणे चांगले वापरले आहे. हाका ऐवजी चाहुली हवेसे वाटते. कारण आहट म्हणजे चाहूल.