आई दे..

आई दे..,वा ... आया दे
काहीही कर, माया दे


दे द्यायाची आहे तर,
विषयावाचुन काया दे


दे प्रेमाला जीवन दे
जावू दे ते वाया...दे


कानी दुष्प्रवृत्तीच्या,
सत्वृत्तीचा फाया दे


रेड्यांना दे वेद तरी,..
मजला गाणी गाया दे


सूर्यालाही तेज मिळो,
बाकीच्यांना छाया दे


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

आई दे..,वा ... आया दे
काहीही कर, माया दे

दे द्यायाची आहे तर,
विषयावाचुन काया दे... मस्त ओळी
-मानस६

फाया आणि छाया हे शेर आवडले!!

बहर छोटी आहे त्यामुळे बरीच बंधने येतात.. माया आणि गाया चे शेर आवडले.

मन:पूर्वक...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

धन्यवाद.
छोट्या बहरबाबत माझीही काही मते आहेत. (संदर्भ : गझलसागर प्रतिष्ठानच्या वाई संमेलनाच्या स्मरणिकेत माझा दीर्घ लेख). आपल्या मताशी मी सहमत होवू शकतो. तथापि, - कॄपया -
१. नेमक्या कोणत्या मर्यादा येतात ? - व-
२. प्रस्तुत गझलेत त्या कोणत्या प्रकारे दिसून येतात ?
 - यांबाबत खुलासा करावा, म्हणजे (पूर्ण ) चर्चा होईल. मला मार्गदर्शनही होईल.
कॄपया, प्रतिसाद द्यावा. पुनश्च धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मनःपूर्वक ....!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

रेड्यांना दे वेद तरी,..
मजला गाणी गाया दे
वा!
सूर्यालाही तेज मिळो,
बाकीच्यांना छाया दे
वा!
संतोषराव, गझल आवडली. 'आया' हे यमक कानांना थोडे खटकले. गमतीशीर वाटल्यामुळे असेल कदाचित.

'आया' हे यमक का खटकले कळले नाही. मला अभिप्रेत असलेला 'आया'चा अर्थ - मुलांचा सांभाळ करण्यासाठी (श्रीमंत कुटुंबात, संगोपन करण्यासाठी वेळ मिळत नाही म्हणून !) पगारी बाई ठेवतात. तसेच, शुश्रुषा करण्यासाठीही - तिला आया म्हणतात - असा आहे. म्हणूनच ...'काहीही कर (पण) माया दे ' असे (नियतीकडे) आर्जव .
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

संतोषराव, तो शेर छानच आहे.

'आया' हे यमक थोडे गमतीशीर वाटल्यामुळे खटकले (हझलची ओळ असल्यासारखी ती ओळ मला वाटली). बाकी काही नाही. शेवटी हे केवळ माझे मत आहे. कलोअ.

चित्तरंजन

छोट्या बहरातील गझल हे कौशल्याचे काम आहे. कमीत कमी शब्दात आशय व्यक्त करता येणे सोपे काम नक्कीच नाही . परंतु असे करताना कधी कधी आपण वृत्ताला अथवा शब्दांना शरण जाऊन कल्पनेचा/विचाराचा आत्मा हरवून बसतो. बहर छोटी असली की वृत्त, शब्दसंख्य, लय यांवर मर्यादा येतात, त्या मर्यादा कळत नकळत विचारांवरही येतात.
आई दे..,वा ... आया दे
काहीही कर, माया दे
या शेराबद्दल मी असे नक्कीच मत मांडणार नाही. यापेक्षा सोप्या, सुटसुटीत आणि नेमक्या शब्दात हीच कल्पना मला सांगता आली नसती त्यामुळे ह्या द्वीपदीला मी मनापासून दाद देईन.
दे प्रेमाला जीवन दे
जावू दे ते वाया...दे

या शेरात "दे" ची पुनरुक्ती कानांना अथवा गुणगुणताना फारसा प्रभाव टाकत नाही.  वाया जाऊ दे ला वृत्तानुसार बदलताना "वाया...दे" ही शब्दरचन सकृतदर्शनी  "अपील" होत नाही. त्यामुळे इथे अर्थ आणि कल्पना यावर वृत्तचे बंधन असल्याचे जाणवते.
कानी दुष्प्रवृत्तीच्या,
सत्वृत्तीचा फाया दे

इथे विचार सरळ समोर येत असल्याने फाया या शब्दापर्यंत येण्याआधीच "पंच" निघून जातो.
'कानी  ... फाया दे' यामध्ये दुसरा एखादा विचार याच वृत्तात मांडायचा झाल्यास शब्दसंखेवर येणार्‍या बंधनाचा अंदाज येईल.

रेड्यांना दे वेद तरी,.. ( रेड्यांना दे वेद मुखी  किंवा वेद मुखी दे रेड्यांचा ... तरी ऐवजी मुखी असा बदल मला सुचला )
मजला गाणी गाया दे
ह्या द्वीपदीतील पहिल्या ओळीची पार्श्वभूमी ठाऊक असल्याने विचारांवर बंधन येत नाही त्यामुळे हाही शेर चांगला आहे.
सूर्यालाही तेज मिळो,
बाकीच्यांना छाया दे
मला सूर्यालाही मधला ही भरीचा वाटतो. सूर्याला तेज आहेच, ते मिळो अशी प्रार्थना करण्यात वरची ओळ वापरण्याऐवजी एखादा सावलीशी संबंधित विचार मांडता येणे शक्य होईल.

छोटी बहर घेऊन मीही गझल लिहिली असल्याने मला जाणवलेल्या बंधनांचीही माझी उजळणी झाली. वरील मतं सर्वस्वी माझी आहेत. ती बरोबरच असतील असा माझ आग्रह नाही :)

लघु वृत्तात लिहितांना  ,वृत्त अथवा यमकाला धरून चालणरे शेर अगदी  सहज  बनत जातात असा माझा वैयक्तीक अनुभव आहे....अशा गझला प्रवाही वाटत असल्या तरी या गझलांमधील शेर ,वरवरची  आकलने / सपाट विधाने याप्रकारात मोडताना दिसून येतात...

अशातली आपली मते बरीच पूर्वग्रहदूषित असल्याचे जाणवते....थोडीफार व्यक्तिसापेक्षही...
तेही चालेल... पण, गझलरचनेबाबत आपले मत तसे असेल तर आपल्या विचाराबाबत आदर बाळगणार्‍या माझ्यासारख्याच्या हा चिंतेचा विषय आहे. धन्यवाद.
 
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

मला वाटते मराठी गझलांमधील चिंतनशीलतेचा अभाव अधिक चिंतेची बाब आहे.असो.माझी मते ,माझी वैयक्तिक आकलने आहेत. ती सर्वांना पटतीलच असे नाही,आणि पटावीत असा आग्रह देखील नाही.

आपणाकडून हेच अपेक्षित आहे. मात्र (ठराविक )गझलेला प्रतिसाद देताना नेमका प्रतिसाद दिला तर काय म्हणायचे आहे, हे कळते. स्पष्ट लिहून मोकळे व्हावे. सर्वसाधारण प्रतिसाद देवून (वेधक शीर्षकासह) काहीच मिळत नाही.
चिंतनशीलतेबद्दल बोलायचे तर कुणी आपणहून तो अधिकार स्वत:कडे घेवू नये. आपण सगळेच मराठी गझल लिहितो. आपल्या चिंतेचा विषय माझ्याही चिंतनाचा विषय आहे. (एवढ्यापुरते एकमत झाले तरी पुरे).  मात्र हा नियम सगळ्यांना सर्ववेळी साऱखा लागू करणे आपल्या प्रामाणिक चिंतनाचे द्योतक असते. 
 
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

लघुवृत्तासंबंधाने बोलताना '..वैयक्तिक अनुभव ..' असा मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे.तेंव्हा मी माझ्या गझलांचे तट्स्थपणे अवलोकन करत आलो आहे , हे मी निश्चीतपणे सांगू शकतो.बाकी स्वत:हून अधिकार स्वत:कडे घेणे ई. आरोप माझ्यासाठी नवीन नाहीत. या पिढीतील बहुतेक ( स्थितीशील  ) कविंशी माझा हा वाद अनेकदा झालेला आहे.स्वत: सुरेश भटांना या पिढीतील कवींकडून फारशी अपेक्षा नसावी ,असे खालील शेरावरून वाटते :

माझ्याच सवे माझे संपेल घराणे ही......

 

मला आश्चर्य याचे वाटते की, आपण सर्वच जण याच पिढीचे (स्थितीशील ?) कवी असताना दुसर्‍या कुठल्या तरी पिढीचे असल्याप्रमाणे आपण (काही जण) का बोलतात, वागतात. सुरेश भटांच्याच मतांचा आधार घ्यायचा तर ते असेही नेहमी म्हणत "...कुणीही संपूर्ण नाही..."
लघुवृत्तासंबंधी माझेही मत काय आहे, हे आपणही वाचले आहे (आपल्या लक्षात असेल तर वाई संमेलनानिमित्ताने स्मरणिकेतील माझ्या लेखाबद्दल आपण समाधान व्यक्त केले होते). खास प्रयत्न / प्रयोग करण्याच्या ईर्षेने लघुवृत्तात अट्टाहासाने ओढूनताणून लिहिणे आणि अंतरोर्मीतून उमटलेले (कोणतेही ) वृत्त यात फरक आहे. पण मग माझे ते अंतरोर्मीतून आणि तुझे ते असे तसे, असे कसे ? हेच माझे म्हणणे.
असो बाकी. अधिक शाब्दिक घोळ आपण आपल्यातच घालून गुंतून जावू नये. जे आपल्या अगोदरच्या गझलकारांच्या पिढीने केले, ते आपल्यात होवू नये - या इच्छेखातर मी इथे थांबतो आहे. एवढ्यावरही इच्छा असेल तर आपण तेही करूच, पण आपापल्या पातळीवर.
माझी अजूनही एक विनंती मात्र आपणास निश्चितपणे असेल ती ही की, एखाद्या गझलेला प्रतिसाद देताना ती गझल कशी आहे हे स्पष्टपणे सांगावे - दोष असतील तर तेही हळुवारपणे सांगता येतात. गझल / कविता आपल्या मताप्रमाणे सुधारायची असेल तर आपले मत नि:संदिग्धपणे मार्गदर्शक पद्धतीने  नोंदवावे.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

आम्ही जे काही करतो आहे ते योग्य आहे , ही भूमिका मराठी कवी सोडणार नाहीत्..असो.माझ्या वतीने मी ही  चर्चा संपवतो आहे.

कुठलेही विस्तारभय न बाळगता जाणिवांचा अभाव, चिंतनशीलतेचा अभाव या मुद्द्यांवर आपण आपली भूमिका सोदाहरण मांडावी. आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून चार गोष्टी कळल्या तर मराठी गझलेच्या नव्या पिढीचे भले होईल.

मीही मागच्याच प्रतिसादात संपवली. आपणही मराठीच कवी आहात. धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०