इथे कुणाला संग हवा?

 

                          इथे कुणाला संग हवा?
                          वरवरचा तर रंग हवा

          विकायला मी सज्ज मला
          असाच सारा ढंग हवा

                           वायद्यासही चुकलेला
                           असा कायदा भंग हवा

          गनीम सख्खा शेजारी?
          हरण्याचा मग चंग हवा

                              तहात भेकड हा येथे
                              रणात कोणी दंग हवा

     

            

गझल: 

प्रतिसाद

प्रयत्न योगेश!
मतला आणि शेवटचा शेर आवडले! मस्त उतरलेत. कायदा शेरही ठीक.
गनीम आणि ढंग शेर मला फार अस्पष्ट वाटले. पुन्हा या २ शेरांवर थोडं काम कराल का? राग नसावा. तुम्हाला काहीतरी फार मनापासून मांडायचय हे जाणवतं म्हणून सुचवतू आहे..

मला हे म्हणायचंय,
पुलस्ति,
      की ढंग या शेरामध्ये आपण आपल्याला विकायची सतत तयारी
आजकाल ठेवावी असं सुचवायचंय. त्यामागची अपरिहार्यता दर्शवायची आहे.
      गनीम शेर आपला सख्खा शेजारी पाकिस्तान आणि त्याच्याबरोबरचे
आपले बोटचेपे धोरण यासंबंधातला आहे.
      तुमच्या प्रतिसादाची अपेक्शा(क्श कसा लिहावा इथे?) यापुढेही आहे.  
 
--योगेश वैद्य.
    
 
 
 

शेरांचे हे अर्थ/उद्देश असतील असा कयास मी बांधला होता.  पण तरीही..
१. "असाच ढंग हवा" = "अशीच तयारी ठेवा" ही थोडी ओढाताण होते आहे असे माझे मत.
२. "गनीम शेजारी आहे म्हणून हरायचा कसून प्रयत्न (चंग) करा" यात जर तुम्हाला उपरोध अपेक्षित असेल तर तो तसा उमटत नाहिये आणि उपरोध अपेक्षित नसेल तर हे तर्कसुसंगत नाही.
बघा पटते का.. नाहीतर सोडून द्या. राग नसावा :)
क्ष हा "x" वापरून लिहावा.
-- पुलस्ति.