कशी वेळ आली? : डॉ. श्रीकृष्ण राऊत

कशी वेळ आली?
क्षमा क्रूर झाली!


हसे आज कुंकू;
गमावून लाली.


करा बंद वर्षा;
पिके तर जळाली.


बगीच्यात प्रेते
फुलांची मिळाली.


बघा ही गटारे;
सुगंधात न्हाली.


खुनी देव झाले;
पुजारी मवाली!


(`गुलाल आणि इतर गझला'संग्रहातून)


भेटा : http://www.mazigazalmarathi.blogspot.com

प्रतिसाद

[quote=डॉ. श्रीकृष्ण राऊत] 
हसे आज कुंकू;
गमावून लाली.
बगीच्यात प्रेते
फुलांची मिळाली.
[/quote]हे दोन्ही शेर अप्रतिम !
 इतक्या छोट्यावृत्तात पहिल्यांदाच गझल वाचली.
आवडली.
अभिनंदन!
 

राही,
मन:पूर्वक आभार.
_ डॉ.श्रीकृष्ण राऊत

कशी वेळ आली?
क्षमा क्रूर झाली!