लढाई
जिंकण्याची एवढी केली तयारी
हारणे झाले मला मग खूप भारी
का विठोबा पावला नाही मला तू
सोडली नाही तुझी मी एक वारी
पाखरांची शेवटी रे हार झाली
माणसांनी घेतली जेंव्हा भरारी
आजही आकाश बघ तेथेच आहे
ये जरा तू चार भिंतीतून दारी
साप जेव्हा विष विकाया लागले मग
तेवढे ते राहिले नाही विषारी
एकदा जवळून बघ जळ्ती चिता तू
शेवटी ही आग नसते संपणारी
जिंकला तू ज्या भरोशावर लढाया
ती तुला झाली अता तलवार भारी
- अभिषेक उदावंत
संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला
गझल:
प्रतिसाद
अभिषेक उदावंत
गुरु, 03/01/2008 - 20:52
Permalink
नविन वर्ष
..................................................................
सर्व गझलकारांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
सगळ्यांनाच छान, दर्जेदार गझला सुचोत...!!
..................................................................
चित्तरंजन भट
मंगळ, 08/01/2008 - 14:35
Permalink
ये जरा तू चार भिंतीतून दारी
आजही आकाश बघ तेथेच आहे
ये जरा तू चार भिंतीतून दारी
वाव्वा..
जिंकला तू ज्या भरोशावर लढाया
ती तुला झाली अता तलवार भारी
हा शेरही आवडला.
अभिषेक उदावंत
शनि, 19/01/2008 - 13:17
Permalink
आभार......
भट साहेब अभिप्राय कळविल्याबद्द्ल आपले आभार.....
असाच लोभ ठेवावा. धन्यवाद.....!