गुलाम केले आम्हाला...

गुलाम केले आम्हाला... हे मालक झाले
गनीम रयतेच्या राज्याचे शासक झाले


विकास अमुच्या दारी सांगा आला का हो ?
हजारवेळा निवडणुकींचे...  नाटक झाले


गरीब  हटले, हटली नाही  अमर गरीबी
गरीब, जन्मा आलो, कसले पातक झाले


पहा पुन्हा या टोळ्या आल्या, लुटले आम्हा
लुटीत... तारणहार, ठग्यांचे हस्तक झाले


कमावता येते धन, येथे... कर घोटाळे
इमानदारीने जगले,  ते... हल्लक झाले


गुन्ह्यास त्यांच्या माफी वरती मोबदलाही
'जिवा' तुला तर 'हूं' करणेही घातक झाले


-जिवा

गझल: 

प्रतिसाद

विकास अमुच्या दारी सांगा आला का हो
हजारवेळा निवडणुकींचे...  नाटक झाले

गरीब  हटले, हटली नाही  अमर गरीबी
गरीब, जन्मा आलो, कसले पातक झाले

अमर गरीबी  ही कल्पना आवडली...

कमावता येते धन, येथे... कर घोटाळे !!

एक सशक्त सामाजिक गझल ..ई-विश्वात आपले हार्दिक स्वागत !
 

गझल चांगलीच झाली आहे.

विकास अमुच्या दारी सांगा आला का हो ?
हजारवेळा निवडणुकींचे...  नाटक झाले

गरीब  हटले, हटली नाही  अमर गरीबी
गरीब, जन्मा आलो, कसले पातक झाले

                                                    'गुन्ह्यास त्यांच्या माफी वरती मोबदलाही
                                                    'जिवा' तुला तर 'हूं' करणेही घातक झाले

लहजा फारच आवडला. ठग्यांचे ऐवजी ठगांचे हवे होते का?