आज फुलांची भाषा.....
आज फुलांची भाषा.....
आज फुलांची भाषा मजला कळते आहे
फूल होऊनी ऊर बघा दरवळते आहे
उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
कोण आज त्या दूर तिथे तळमळते आहे?
शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?
आज काय रे तुझ्या मनी खळबळते आहे?
आज वाल्मिकी पुन्हा करु सुरवात नव्याने,
क्रौन्च होऊनी ऊर अता भळभळते आहे
एक पालखी हाय, जरी ही दूर निघाली,
नजर ’आतली’ मात्र मजकडे वळते आहे!
आज जरी हा पिंपळ इथला वठून गेला ,
एक-एक हे पान बघा; सळसळते आहे!
- मानस६
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
सोम, 31/12/2007 - 19:39
Permalink
छान...
शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?
आज काय रे तुझ्या मनी खळबळते आहे?
एक पालखी हाय, जरी ही दूर निघाली,
नजर ’आतली’ मात्र मजकडे वळते आहे!
आज जरी हा पिंपळ इथला वठून गेला ,
एक-एक हे पान बघा; सळसळते आहे!
छान...आवडले हे शेर, मानस.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
अनंत ढवळे
मंगळ, 01/01/2008 - 12:34
Permalink
शांत
शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?
आज काय रे तुझ्या मनी खळबळते आहे?
आज वाल्मिकी पुन्हा करु सुरवात नव्याने,
क्रौन्च होऊनी ऊर अता भळभळते आहे
आज जरी हा पिंपळ इथला वठून गेला ,
एक-एक हे पान बघा; सळसळते आहे!
उत्कॄष्ट गझल्...वरील तीन शेर तर अतिशय सुंदर आहेत ..
चित्तरंजन भट
मंगळ, 08/01/2008 - 14:38
Permalink
शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?
अनंत आणि प्रदीप ह्यांच्याशी सहमत. गझल उत्तम झाली आहे मानस.
शांत सागरा, आज कश्या ह्या निमूट लाटा?
आज काय रे तुझ्या मनी खळबळते आहे?
हा शेर तर फारच आवडला.