माझा स्वभाव नाही
माझा स्वभाव नाही
कुठल्याच मंदिराचा मजवर प्रभाव नाही
तरीही इथे सुखाचा काही अभाव नाही
सत्ता इथे मठांची आणिक आश्रमांची
घामास अन् श्रमांना कोठेच वाव नाही
नित्यारती हवी रे हर एक दैवताला
ज्याला नसे पुजारी त्याचा निभाव नाही
चरितार्थ चालविती जत्रा नि कुंभमेळे
नवसास पावल्याविण देवास भाव नाही
जो अंतरी सदाचा माझ्या वसून आहे
बाहेर शोधण्याचा माझा स्वभाव नाही
-अविनाश ओगले
गझल:
प्रतिसाद
नितीन
रवि, 23/12/2007 - 04:08
Permalink
अन ओठ शोध्ण्याचा माझा स्वभाव नाही...
आले तुझ्या ओठी माझे नाव कधी
अन ओठ शोध्ण्याचा माझा स्वभाव नाही...
भटसाहेबांच्या या ओळी आठवल्या...