वाच पुस्तके!


वाच पुस्तके!

जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके
जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके

ग्रंथांवाचून अर्थहीन हे अवघे जीवन
जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके

संस्कारानी घडतो माणूस, मोठा होतो
मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके

सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा-
हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके

आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती
हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके

स्वत्व, संस्कृती, मायमराठी हवी जपाया
मातीचा अभिमान पाहिजे; वाच पुस्तके


गझल: 

प्रतिसाद

नमस्कार अविनाशपंत,
सर्वप्रथम मैफिलीत हार्दिक स्वागत.
आपला,
(स्वागतोत्सुक) धोंडोपंत
गझल पेश केल्याबद्दल धन्यवाद. सुंदर गझल.  आवडली.
स्वत्व, संस्कृती, मायमराठी हवी जपाया
मातीचा अभिमान पाहिजे; वाच पुस्तके

क्या बात कही है! फारच छान.
आपल्या गझला येथे वारंवार वाचायला मिळोत ही अपेक्षा.
आपला,
(साहित्यप्रेमी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

ग्रंथांवाचून अर्थहीन हे अवघे जीवन
जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके

आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती
हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके

खरे आहे, ओगलेसाहेब.  गझल आवडली. विशेषतः अन्त्ययमक. ह्या संकेतस्थळावर तुमचे स्वागत!

ई जगतात आपले स्वागत ...

दुसरा शेर आवडला! आपल्या पुढील गझलेची वाट पाहतो..