क्षणोक्षणी....


 


राहतो जरी तुझ्या नशेत मी क्षणोक्षणी....
जाणवे तरी मला तुझी कमी क्षणोक्षणी....

अंग अंग चिंब रंग खेळलो असा गडे..
की स्मरेल हीच रंगपंचमी क्षणोक्षणी....

वाट पाहुनी अधीरता शिगेस पोचली..
मी रहायचे कितीक संयमी क्षणोक्षणी..?

बोलणे नि भेटणे कमी करून टाकले..
मंद होत चालली तुझी हमी क्षणोक्षणी....

नाटकामधील काम संपले जरी तुझे...
जीवनातल्या सुरूच तालमी क्षणोक्षणी....


अमित वाघ.
"गुरूमंदिर" सुधीर कॉलनी, अकोला-४४४००१.
मोबाईल नं. :- ९८५०२३९८८२, ९९७०१६७५७२.


 


 

गझल: 

प्रतिसाद

अतिशय सुंदर गझल आहे. सगळे शेर छान झाले आहेत. मतला आणि शेवटचा शेर विशेष आवडले. हमी, संयमी सुद्धा छान. पण या दोन शेरांच्या वरच्या ओळी जरा सपाट वाटल्या, चूभूद्याघ्या. त्याबद्दल काही करता येईल का / आले असते का, याचा विचार करतो आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

तालमी - मस्त मस्त शेर!! हमी शेरही आवडला.

जीवनातल्या सुरूच तालमी क्षणोक्षणी....


नाटकामधील काम संपले जरी तुझे...
जीवनातल्या सुरूच तालमी क्षणोक्षणी....

सुंदर शेर...

 

झकास गझल आहे. वेगळे काफिये निवडून त्यांचा समर्पक वापर केलेला आहे. 

एकंदर अगदी छान गझल आहे. मतला अगदी आकर्षक आणि शेवटचे दोन शेर विशेष. सगळ्यांत त्यातही तालमी लक्षणीय.

[quote=चक्रपाणि]अतिशय सुंदर गझल आहे. सगळे शेर छान झाले आहेत. मतला आणि शेवटचा शेर विशेष आवडले. हमी, संयमी सुद्धा छान. पण या दोन शेरांच्या वरच्या ओळी जरा सपाट वाटल्या, चूभूद्याघ्या. त्याबद्दल काही करता येईल का / आले असते का, याचा विचार करतो आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस[/quote]

चांगली गझल आहे !!
जीवनातल्या सुरूच तालमी क्षणोक्षणी....

 गझलेमध्ये विषयवैविध्य असल्यास गझला आणखीनच सकस होतात असा अनुभव आहे.दरवेळी नवीन काही लिहिणे शक्य नसले , तरी शेराच्या शक्य तितक्या अर्थ संभावना शोधणे निश्चीत शक्य आहे..
सूचना अथवा सल्ला नाही..केवळ एक निष्कर्ष आहे..शेवटी सर्जन ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे..