वारे जरासे गातील काही..

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही

झाकून डोळे हसलीस ओठी
कळले तुझ्या मौनातील काही

म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी
ढळलेत बघ डोळ्यातील काही

घायाळ करती हृदयें हजारों
नजरा तुझ्याही कातील काही

संसार सागर जातील तरण्या
बुडतील काही, न्हातील काही

दुःखे जगाची का रंगवू मी?
जगतो सुखाने त्यातील काही

सोडू नये सुख, कुठल्या क्षणाचे
मिळते जरी अंशातील काही
किंवा / आणि
वेसण कशाला घालू सुखाला?
मिळते किती? अंशातील काही

अंधार जितका, तितकीच आशा...
उजळेल कोनाड्यातील काही

घ्यावे 'अजय' सारे जे हवे ते
सोडू नये पण... हातील काही

- अजय अनंत जोशी (2014)

गझल: 

प्रतिसाद

वारे जरासे गातील काही
येतील काही, जातील काही

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही

शेर आवडले ...

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यांत दिसले आतील काही
वा छान. मतलाही आवडला.

हृदयी तुझ्या मी येणार होतो
इतक्यात दिसले आतील काही

वा वा

धन्यवाद।!