कवडसा
कंकण हळुहळु टिचले रात्री
दु:ख जगाचे थकले रात्री
नवोदयाचा ध्यास उशाला
स्वप्न पांघरुन निजले रात्री
खूप डिवचुनी मला चिडवुनी
दीप अचानक विझले रात्री
मिणमिणता आतुर कवडसा
बंध गाठिचे सुटले रात्री
कवेत घे ही गझल राजसा
अधर तुझे पुटपुटले रात्री
_____________बापू दासरी, नांदेड
गझल:
प्रतिसाद
नितीन
शुक्र, 23/11/2007 - 18:31
Permalink
अतिशय सुंदर...
नवोदयाचा ध्यास उशाला
स्वप्न पांघरुन निजले रात्री
गझल आवडली...
पुलस्ति
शुक्र, 23/11/2007 - 21:50
Permalink
छान
मतला आणि शेवटचा शेर फार आवडले!!
अनंत ढवळे
शनि, 24/11/2007 - 17:33
Permalink
दु:ख जगाचे थकले रात्री
अतिशय चांगला मिसरा आहे.
दु:ख जगाचे थकले रात्री
ई-विश्वात आपले स्वागत आहे !
चित्तरंजन भट
शनि, 24/11/2007 - 22:56
Permalink
वा!
कंकण हळुहळु टिचले रात्री
दु:ख जगाचे थकले रात्री
वा!
कवेत घे ही गझल राजसा
अधर तुझे पुटपुटले रात्री
वा!
एकंदर गझल आवडली बापू. स्वागत आहे!
चक्रपाणि
रवि, 25/11/2007 - 20:14
Permalink
छान
गझल आवडली. छान आहे. पुढील शेर विशेष आवडले -
नवोदयाचा ध्यास उशाला
स्वप्न पांघरुन निजले रात्री
खूप डिवचुनी मला चिडवुनी
दीप अचानक विझले रात्री
मतल्यातील कंकण टिचण्याचा आणि रात्री दु:ख थकण्याचा परस्परसंबंध मला नीट न कळल्याने शेर काहीसा अस्पष्ट वाटला. हेच कवडशाच्या शेराबाबत जाणवले. चूभूद्याघ्या.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 27/11/2007 - 18:47
Permalink
छान, दमदार गझल....
स्वागत, बापूसाहेब.
छान, दमदार गझल.
दु:ख जगाचे थकले रात्री....सुंदर ओळ. शुभेच्छा....
येऊ द्या आणखीही गझला...
बापू दासरी
बुध, 28/11/2007 - 14:13
Permalink
आभार
आपण मला चेतना दिली त्याबद्द्ल आभार- बापू दासरी
अमित वाघ
शुक्र, 30/11/2007 - 20:37
Permalink
साधा सरळ अर्थ ...
साधा सरळ अर्थ आहे ...
[कंकण रात्री का टिचतात हे सांगण्याची गरज नाही आणि त्याच कारणाने थोडा काळ का होइना सर्व सामान्य माणूस जगाचे दु:ख विसरतोच...
"संबंध" हाच त्या दोन ओळीतला संबंध आहे.. असे मला वाटते...]
बापू साहेब..
गझल आवडली...
कवडसा शेर मलाही नाही समजला....
पण समजून घ्यायची इच्छा आहे...
मिल्या
रवि, 02/12/2007 - 16:53
Permalink
आवडले
दु:ख जगाचे थकले रात्री
स्वप्न पांघरुन निजले रात्री
दोन्ही मिसरे खूप आवडले.
जनार्दन केशव म्...
बुध, 05/12/2007 - 19:23
Permalink
सहमती..
बापू,
मी अमितच्या मताशी सहमत आहे...
धोंडोपंत
शनि, 08/12/2007 - 18:26
Permalink
नमस्कार बापू
नमस्कार बापू,
मैफिलीत स्वागत. गझल आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(स्वागतोत्सुक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
विसुनाना
सोम, 10/12/2007 - 17:08
Permalink
गझल आवडली
शेवटचा शेर सर्वात जास्त आवडला.
संतोष कुलकर्णी
मंगळ, 18/12/2007 - 19:01
Permalink
आवडली
...पण मला तरी मतल्यातील दोन मिसर्यांचा परस्परसंबंध समजला नाही. कृपया, कळवावा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०