यातना........
या... तना...
यातना...
का मना...?
कामना..!
साध.. ना..
साधना..
मोह ना..
मोहना....
जीव... ना..
जीवना...
गझल:
जन्मले घेऊन जे पायात काटा
त्या भणंगांनीच यात्रेला निघावे
या... तना...
यातना...
का मना...?
कामना..!
साध.. ना..
साधना..
मोह ना..
मोहना....
जीव... ना..
जीवना...
प्रतिसाद
संतोष कुलकर्णी
सोम, 29/10/2007 - 11:48
Permalink
चांगला प्रयोग
प्रिय अमित,
आपल्या या गझलेचे मी एक प्रयोग म्हणूनच - आणि यशस्वी प्रयोग म्हणूनच - अभिनंदन करतो आहे. एरवी मला याबाबतीत - अतिछोट्या बहराबाबतीत - आणि त्यातून उद्भवणार्या परिणामांबद्दल एक (अनाठायी ?) काळजी वाटते. (याबाबतीतले माझे मत मी गझलसागरच्या वाई येथील संमेलनाच्या स्मरणिकेतील सविस्तर लेखात व्यक्त केलेले आहे. ) आपली ही गझल धुळ्याचे तरुण गझलकार दर्शन शहा यांनी फार कौतुकाने ऐकवली होती. त्यांनी तर , वेदना .... वेद ..ना' असा काहीसा शेरही ऐकवल्याचे मला स्मरते.)
यासंदर्भात माझे म्हणणे असे की, कवींनी (विशेषतः गझलकारांनी) शब्दचमत्कृतीच्या मोहात पडू नये. कविसमाधी व अंतरोर्मी म्हणून जी काही असते तिलाच प्रामाणिक राहून गझल (किंवा कविता साकारावी). बाकी आपल्या या गझलेतले अर्थवाहीपण लाजवाब आहेच. पण शेवटी ही शब्दचमत्कृती आणि प्रयोगशीलतेचा भाग म्हणून (अधिक) स्स्वीकारावी अशीच गझल आहे, ही बाब आपणही स्वीकाराल असे वाटते.
आपण एक भरवश्याचे गझलकार आहात. आपल्या इतरही गझला मी वाचल्या आहेतच. आपल्याकडून (मोहात न पडता ) उत्तमोत्तम गझला होणार असताना मोहात पडताच कशाला?
दुसरे असे की, आपल्या (किंवा कुणाच्याही) अशा प्रयोगामुळे नवनव्या गझलकारांना वेगळाच संदेश मिळतो. अर्थात, या गोष्टी पटल्या तरच स्वीकाराव्यात. नाहीतर एक वैयक्तिक (पण प्रामाणिक) मत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यास हरकत नाही. मात्र गैरसमज न व्हावा ही विनंती.
आपल्या गझलेचे तर मी अभिनंदन केलेलेच आहे. मतभेद असतील तर अभिनंदन अधिक महत्वाचे आणि मनातून आहे, याबद्दल खात्री असावी. नजिकच्या काळातील (ज्येष्ठ)गझलकारांचे एकमेकांशी वर्तन पाहता फार खुलासे करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून ही काळजी.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
चित्तरंजन भट
सोम, 29/10/2007 - 18:08
Permalink
इंटेलिजंट!
प्रिय अमित, इंटेलिजंट गझल आहे. मी यमके झाली आता गझलही येऊ द्या असे
लिहिणार होतो :) संतोष कुलकर्णींच्या अनेक मुद्द्यांशी मी सहमत आहे.
असो.पुढच्या गझलेसाठी शुभेच्छा. -चित्तरंजन
जितेंद्र शिन्दे... (not verified)
सोम, 29/10/2007 - 18:55
Permalink
शुभेच्छ्या
ख्ररंच गझल म्हणजे काळजाची भाषा असते, याची अनूभुती आली.
पुढिल कसदार लेखनासाठि मनःपुर्वक शुभेच्छ्या....!
अमित वाघ
सोम, 29/10/2007 - 21:44
Permalink
मोहाच्या मोहात पडणे टाळेन....
मा. प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी,
मी आपल्या मतांशी पुर्णपणे सहमत आहे..
ही गझल निव्वळ प्रयोगच आहे यात शंका नाही..
या गझले मागे मोह हे एकमेव कारण आहे..
मुळात ही गझल मी सुरूवातीच्या काळात लिहिली त्यामुळे तीत शब्दचमत्कृती आणि प्रयोगशीलतेचा प्रभाव आढळतो..
एक प्रयोग... आणि त्यातल्या त्यात या गझल चे आकर्षण..
या दोन्ही गोष्टींच्या मोहाला बळी पडून गझल प्रसिध्द करण्याचे धाडस केले..
तसेच मतभेद असणे किंवा निर्माण करणे हे ज्येष्ठ गझलकारांचे काम...
उगाच लहान तोंडी मोठा घास नको..
कुठलाही मतभेद तर नाहीच आणि गैरसमज तर मुळीच नाहीत...
आपल्या सुचनांचे मनापासून स्वागत...
धन्यवाद...
..
अगदी मनापासून...
कोठलाही संकोच न बाळ्गता अभिप्राय कळवावा...
चक्रपाणि
मंगळ, 30/10/2007 - 06:57
Permalink
सहमत
संतोषरावांच्या मुद्द्यांशी मी सहमत आहे; आणि अमितरावांच्या गझलशिक्षणातल्या सुरुवातीच्या दिवसात असणार्या आकर्षण आणि शब्दचमत्कृतीदी अनुभवांशी पण :)
- चक्रपाणि जीवन चिटणीस
पुलस्ति
मंगळ, 30/10/2007 - 08:56
Permalink
सहमत
१००% सहमत आहे.
संतोष कुलकर्णी
मंगळ, 30/10/2007 - 12:18
Permalink
प्रिय
प्रिय अमितजी,
आपले मनमोकळे मनोगत वाचले. स्वीकारण्याची तयारी आणि कबूल करण्याची वृत्ती ही आपल्या मनाच्या सशक्ततेची खूण आहे. आपले मन असेच निर्मळ आणि चिरतरुण राहो... निर्भेळ आणि निर्दोष गझलनिर्मितीसाठी आणि आयुष्यातही आपला फायदाच त्याने होणार आहे.
मला नवा मित्र मिळाल्याचा आनंद झाला आहे. धन्यवाद. शुभेच्छा..
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
अनंत ढवळे
शुक्र, 02/11/2007 - 20:20
Permalink
संवादित्व आणि आशय...
गझल ही एक संवादी काव्यविधा आहे...या संवादित्वाचा गाभा मात्र आशयच आहे...त्यामुळे मला वाटते की गझलेतील आशय हा अधिक महत्वाचा आहे...अष्टाक्षरी असो वा अनुष्टुभ , छोटे वृत्त असो वा दीर्घ, शेवटी काय लिहितोय, हाच चांगल्या गझलेचा निकष राहील...एरवी शंभर शेरांची गझल लिहा अथवा तीन मिसऱ्यांचे शेर, त्या लिखाणात जीवनाचा अंश नसेल तर काय लाभ ?
प्रयोगात सहजता असावी, जाणीवपूर्वकता नको , असेही म्हटले जाते...कवितेच्या मूळ गाभ्यास धक्का न पोचवणारे प्रयोग साहित्यात महत्वाची भर घालत असतात. गझलेच्या बाबतीत म्हणाल, तर गझलेचा अफाट आशय आणि लयाधारी घाट प्रयोगांस भरपूर वाव देणारा आहे. प्रयोग आणि सहज अभिव्यक्ती ह्या दोन घटकांमधील अतिशय पातळ रेषेचे भान ठेवून लिहिणार्या कवींचे स्वागतच आहे !!
काही दशकांपूर्वी एका महान मराठी कवीने आपल्या भाषेचा बाज कायम ठेऊन उर्दू भाषेतली एक उभी काव्यविधाच आपल्या साहित्यात आणली होती.
त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे !!!
संतोष कुलकर्णी
सोम, 12/11/2007 - 17:08
Permalink
हेच
मलाही म्हणायचे आहे....पण समीक्षेच्या भूमिकेतून नव्हे...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०