जीवन


धापा टाकू लागे जीवन..
..श्वासांचे ॠण मागे जीवन


ही भासांशी  शय्यासोबत..
...स्वप्नांपुरते जागे जीवन


माझे चांगुलपणही सोडुन,
माझ्यासंगे वागे जीवन..


वरवरचे हे असते ले़खन
...हृदयी विणते धागे जीवन


मी कोणाच्या मागे नाही...
...माझे माझ्या मागे जीवन...


एक दिलासा पुरतो केवळ..
तितक्यानेही भागे जीवन

                                     - प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

गझल: 

प्रतिसाद

ही भासांशी  शय्यासोबत..
...स्वप्नांपुरते जागे जीवन

एक दिलासा पुरतो केवळ..
तितक्यानेही भागे जीवन ----गझल व हे शेर खास!
चांगुलपणाचा शेर थोडा अधिक अर्थवाही  होऊ शकेल का?
जयन्ता५२

मनापासून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

ही भासांशी  शय्यासोबत..
...स्वप्नांपुरते जागे जीवन
वा क्या बात है!! गझल आवडली.

ही भासांशी  शय्यासोबत..
...स्वप्नांपुरते जागे जीवन

खूपच छान...

धापा टाकू लागे जीवन..
..श्वासांचे ॠण मागे जीवन  

ही भासांशी  शय्यासोबत..     (सुंदर कल्पना)
...स्वप्नांपुरते जागे जीवन

मी कोणाच्या मागे नाही...
...माझे माझ्या मागे जीवन...

वरील शेर फार आवडले. शुभेच्छा.

जागे, धागे आणि मागे हे शेर खूप आवडले!!

ही भासांशी  शय्यासोबत..
...स्वप्नांपुरते जागे जीवन

वावावा! मस्त शेर आहे. फार आवडला. एकूण गझलही छान वाटली.
मी कोणाच्या मागे नाही...
...माझे माझ्या मागे जीवन...

या शेराच्या खालच्या ओळीत माझ्या मागेमागे जीवन असा बदल सुचवावासा वाटला. मागेमागे या शब्दामुळे ओळीत आणि शेरातही जास्त मजा येईल, असे मला वाटले. चूभूद्याघ्या.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

मनापासून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि सूचनेबद्दलही मनःपूर्वक धन्यवाद.
'मागे' संबंधी शेराचा मला अभिप्रेत असलेला अर्थ 'मागे लागलेले जीवन' असा असल्यामुळे तसा बदल मी करत नाहीए. मला असे वाटते आपल्याला भावलेला अर्थ 'मागे असलेले जीवन' असा आहे. आपल्यालाही अभिप्रेत असलेल्या अर्थाचा भंग होत नाही , असा शब्दप्रयोग कायम ठेवतो. गैरसमज नसावा. 

पुनःश्च धन्यवाद आणि ह्याच प्रतिसादाची अपेक्षा. आणि हो... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!


प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

छान गझल. आवडली. छोटी बहर.  नादमाधुर्य विलक्षण.
आपला,
(तृप्त) धोंडोपंत
चक्रपाणि पंतांनी सुचविलेला बदल आम्हाला गझल वाचतानाच लक्षात आला.  त्यांच्याशी सहमत.
 " माझ्या मागे मागे जीवन" हा मिसरा, तुम्ही ज्या अर्थाने हा शेर घेतला आहे त्याच अर्थाने आम्हाला जास्त भावतो.  किंबहुना
" मागेमागे" याचा अर्थ मागे लागलेले असाच होतो असे वाटते.
"माझे माझ्या मागे जीवन" याचा अर्थ मागे लागलेले नसून मागे असलेले असा होतो.
मागेमागे ही द्विरुक्ती असलेले नसून लागलेले सूचित करते.
अर्थात कोणता बदल स्विकारायचा वा कोणता नाकारायचा हा सर्वस्वी आपला अधिकार आहे.
आपला,
(चिकित्सक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मनःपूर्वक धन्यवाद.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०