काही असे घडावे
काही असे घडावे
नजरेस तू पडावे
स्वप्नात शोधिले ते
सत्यात कां दडावे?
वैरीहि तो असा की
मन त्यावरी जडावे
मी मागता फुले,कां
सारे बहर झडावे?
मी कोण,काय होतो
की मज कुणी रडावे ?
जयन्ता५२
गझल:
तुरुंगासारखे आयुष्य माझे...
करू मी, हाय, पोबारा कितीदा !
काही असे घडावे
नजरेस तू पडावे
स्वप्नात शोधिले ते
सत्यात कां दडावे?
वैरीहि तो असा की
मन त्यावरी जडावे
मी मागता फुले,कां
सारे बहर झडावे?
मी कोण,काय होतो
की मज कुणी रडावे ?
जयन्ता५२
प्रतिसाद
पुलस्ति
गुरु, 11/10/2007 - 20:00
Permalink
छान!
मस्त गझल जयंतराव! दडावे आणि रडावे हे शेर विशेष आवडले...
कुमार जावडेकर
गुरु, 11/10/2007 - 22:22
Permalink
वा!
जयंतराव,
वैरीहि तो असा की
मन ज्यावरी जडावे- वा! सुंदर शेर...
'दुश्मन को भी सीने से लगाना नही भूले
हम अपने बुजुर्गों का जमाना नही भूले' ही जगजीतची गझल आठवली. (शायर आठवत नाही).
मतलाही आवडला.
- कुमार
चित्तरंजन भट
शुक्र, 12/10/2007 - 10:14
Permalink
वा!
बहर विशेष. वैर्याचा शेर तर मस्तच आहे. छान गझल जयंतराव!
चक्रपाणि
शुक्र, 12/10/2007 - 14:24
Permalink
सहमत
आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 12/10/2007 - 20:26
Permalink
सुंदर गझल
जयंतराव...
अप्रतिम, सुंदर गझल...छोट्या वृत्तातील प्रभावी रचना...
मानस६
शनि, 13/10/2007 - 16:03
Permalink
वैरीहि तो असा की
वैरीहि तो असा की
मन त्यावरी जडावे...
मी मागता फुले,कां
सारे बहर झडावे?... पण ही छोटा बहर छान!
-मानस६