पारिजात


पेटली तुझी धरा नि मी अधीर आसमंत...
ये समीप तू अजून मज बघायचा दिगंत....

चुंबिलेस ज्या फुलास; त्यास लाभला सुवास.....
वाहतो जणू नसात साजणे तुझ्या वसंत...

पाहते उभी दुरून; मौन व्यर्थ पांघरून....
आणखी कितीक वेळ पाहशी तुझाच अंत.....

कोरलीस तू अखेर; काळजावरी लकेर...
टाकले करून आज जीवनास भाग्यवंत....

काल मी तुझ्या तनात; ठेवलाय पारिजात...
दूर दूर चांदण्यात हीच बातमी ज्वलंत....


गझल: 

प्रतिसाद

या रचनेला काय म्हणावं हे कळत नाही. पण अतीशय छान आहे.
काल मी तुझ्या तनात;
ठेवलाय पारिजात...
दूर दूर चांदण्यात हीच बातमी ज्वलंत....
सुंदर...
(गीतसदृश्य गझल कि गझलसदृश्य गीत?) गझलेसारखी लिहीली असती तर कन्फ्युजन कमी झाले असते.
 

पाहते उभी दुरून; मौन व्यर्थ पांघरून.... 
आणखी कितीक वेळ पाहशी तुझाच अंत.....

वा! शेवटचा शेर अप्रतिम

    जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे. असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते . की तूम्ही सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे . एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर .

चांगली मुसलसल  ,स्वच्छ गझल.

चुंबिलेस ज्या फुलास; त्यास लाभला सुवास.....
वाहतो जणू नसात साजणे तुझ्या वसंत...

पाहते उभी दुरून; मौन व्यर्थ पांघरून....
आणखी कितीक वेळ पाहशी तुझाच अंत....
उमदी गझल... आवडली
-मानस६

धन्यवाद....
ख्ररच गझल लिहिण्यात चुकी झाली होती ...
या नंतर गझल ही गझलसारखीच लिहित जाईल..
गझल व्यवस्थित केली म्हणून sureshbhat.in चे आभार....
अभिप्राय देणार्‍यांचे आणि केवळ वाचणार्‍यांचे मन:पूर्वक आभार....

वाव्वा!

काल मी तुझ्या तनात; ठेवलाय पारिजात...
दूर दूर चांदण्यात हीच बातमी ज्वलंत....
 
सुंदर......  एकंदर आवडली.