जाहिरात - अभिषेक उदावंत
लावली छातीस माती
सुर्य आला सहज हाती ...
देव नाही देत भाकर
सांगतो ठोकून छाती...
हात केला वर जरासा
लागले आकाश हाती...
बंद खिडक्या बंद दारे
स्वागताच्या जाहिराती...
रक्त जेव्हा थंड होते
बंद पडते, सर्व क्रांती...
जा विचारा विट्ठलाला
फालतू आहेत जाती...
कोरडा पाऊस आला
अन् करपली सर्व नाती !
- अभिषेक उदावंत ( संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला )
गझल:
प्रतिसाद
नितीन
गुरु, 27/09/2007 - 18:35
Permalink
बंद खिडक्या बंद दारे
बंद खिडक्या बंद दारे
स्वागताच्या जाहिराती...
आवडले, चांगली गझल.
प्रदीप कुलकर्णी
मंगळ, 02/10/2007 - 00:25
Permalink
वा...वा...
हात केला वर जरासा
लागले आकाश हाती...
जा विचारा विट्ठलाला
फालतू आहेत जाती...
कोरडा पाऊस आला
अन् करपली सर्व नाती !
वा...वा... अभिषेक, शुभेच्छा.
पुलस्ति
मंगळ, 02/10/2007 - 22:28
Permalink
छान!
विठ्ठल आणि जाहिराती हे शेर आवडले!
ह बा
मंगळ, 15/06/2010 - 17:19
Permalink
लावली छातीस माती सुर्य आला
लावली छातीस माती
सुर्य आला सहज हाती ...
देव नाही देत भाकर
सांगतो ठोकून छाती...
छान.
मिलिन्द हिवराले
शनि, 26/06/2010 - 15:53
Permalink
गझल आवडली. शुभेच्छा...
गझल आवडली. शुभेच्छा...
आनंदयात्री
शनि, 26/06/2010 - 17:18
Permalink
ही आधीही कुठेतरी वाचल्यासारखी
ही आधीही कुठेतरी वाचल्यासारखी वाटते...
गझल चांगलीच आहे...
मनोज ठाकूर
गुरु, 08/07/2010 - 16:29
Permalink
क्या बात है!!! जियो ...
क्या बात है!!! जियो ...
गंगाधर मुटे
शुक्र, 09/07/2010 - 12:34
Permalink
लावली छातीस माती सुर्य आला
लावली छातीस माती
सुर्य आला सहज हाती ...
वा. वीररसाला शोभेशी.
बंद खिडक्या बंद दारे
स्वागताच्या जाहिराती...
रक्त जेव्हा थंड होते
बंद पडते, सर्व क्रांती...
हे शेर आवडलेत.
कैलास गांधी
बुध, 14/07/2010 - 15:43
Permalink
क्या बात है!!
क्या बात है!!
विडंबनकार बापू
शुक्र, 16/07/2010 - 18:21
Permalink
लावली छातीस माती सुर्य आला
लावली छातीस माती
सुर्य आला सहज हाती ...
माती महत्वाची आहे मामा... फार छान!
प्रविण हटकर
मंगळ, 21/09/2010 - 16:58
Permalink
सुन्दर. मस्त मस्त..........
सुन्दर. मस्त मस्त..........