मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता !
...थांब की जरा !
...थांब की जरा !
थांब की जरा तू बाई....थांब की जरा !
एवढी कशाला घाई...थांब की जरा !
मज खुणावते केव्हाची तेथली जुई...
येथली म्हणे ही जाई...`थांब की जरा` !
मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !
राहशील मागे आता तू तरी कसा...?
द्यायची तुला भरपाई...थांब की जरा !
वेदना, व्यथा, दुःखेही पोतडीत या...
पाहण्यास ही नवलाई...थांब की जरा !
ध्यास तू पुरेसा माझा घेतलास का ?
मी दिसेन ठाई ठाई...थांब की जरा !
कोणते खरे अन् खोटे कोणते बरे...?
जाणशील तू सच्चाई...थांब की जरा !
का उगाच डोळे आधी लागले मिटू...?
संपली कुठे अंगाई...थांब की जरा !!
सोडतोस का रे बाबा धीर तू असा...?
व्हायची उद्या स्वस्ताई...थांब की जरा !
ऐक वा नको ऐकू तू अंतरा कधी...
ऐक ऐक ही अस्ताई...थांब की जरा !
हो, तुलाच देतो गाणे वाचण्यास मी...
वाळली कुठे ही शाई...थांब की जरा !
ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` !
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
प्रतिसाद
मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !
का उगाच डोळे आधी लागले मिटू...?
संपली कुठे अंगाई...थांब की जरा !!
ऐक वा नको ऐकू तू अंतरा कधी...
ऐक ऐक ही अस्ताई...थांब की जरा !
हो, तुलाच देतो गाणे वाचण्यास मी...
वाळली कुठे ही शाई...थांब की जरा !
ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` !
वा! वा! वा! एकाहून एक!
क्या रदीफ-काफिया है! जबरदस्त गझल.
मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा !
वेदना, व्यथा, दुःखेही पोतडीत या...
पाहण्यास ही नवलाई...थांब की जरा !
सर्वच शेर आवडले. प्रदीपजी नेहमीच छान लिहितात. मजा आली.
मी पुढे पुढे जाण्याचे योजतो जरी...
सांगते मला सटवाई...थांब की जरा ! अप्रतिम.
ध्यास तू पुरेसा माझा घेतलास का ?
मी दिसेन ठाई ठाई...थांब की जरा .... जणू कविताच कविला सांगतेय.
हो, तुलाच देतो गाणे वाचण्यास मी...
वाळली कुठे ही शाई...थांब की जरा ! वाचक म्हणून मी एवढाच अधिर्,प्रदिपजी
ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` ! ह्रुदय स्पर्शी
ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` !
अप्रतिम. वाचुन डोळ्यांत पाणी आले.
म्हणायचे होते. गझल फार आवडली.
प्रदीप,
अतिशय सुंदर गझल...
वेदना, व्यथा, दुःखेही पोतडीत या...
पाहण्यास ही नवलाई...थांब की जरा ! - वा! सुंदर.
'अस्ताई' वरून माझी एक गझल / त्यातला एक शेर आठवला.
जीवनाचा नूर आहे वेगळा
ताल, लय अन् सूर आहे वेगळा
गुंतशी स्थायीत का तू सारखा?
(अंतरा भरपूर आहे वेगळा)
ऐकलेच नाही माझे शेवटी तिने....
मी म्हणूनसुद्धा- `आई, थांब की जरा` ! ... याबद्दल लिहिण्यासाठी शब्द नाहीत.
- कुमार
अप्रतिम गझल
जावडेकरांशी सहमत.
सुंदर गझल प्रदिप. आवडली.
अस्ताई, स्वस्ताई, शाई, सटवाई - वा वा!!
आई शेराबद्दल कुमारशी अगदी सहमत... शब्दच नाहीत...