दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?
केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा
आहे कोण जगात मित्र अथवा वैरी मनासारखा ?
कोणी का इतका कुणास जपतो वा जाचतो सारखा ?
रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली
दर्पाने कसल्या प्रकाश परका घोंघावतो सारखा?
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा
भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा

गझल:
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
सोम, 06/08/2007 - 13:00
Permalink
व्वा
भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
फारच आवडले...
प्रमोद हरदास
सोम, 06/08/2007 - 15:24
Permalink
फार छान
नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा
फार आवडला...
प्रदीप कुलकर्णी
सोम, 06/08/2007 - 17:15
Permalink
जबरदस्त
अप्रतिम...
शार्दूलविक्रीडितातील जोरदार गझल...जबरदस्त मतला...
..................
केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा
रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !
भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
..................
सारेच शेर खणखणीत...वा...येऊ द्या अजून...
संतोष कुलकर्णी
सोम, 06/08/2007 - 18:27
Permalink
सुंदर
फारच सुंदर! आभाळा, चकवा - हे शेर आवडले....! - संतोष
सोनाली जोशी
सोम, 06/08/2007 - 21:20
Permalink
ये मागे परतून्
खूप दिवसांनी तुझी गझल वाचायला मिळाली, सुंदर, प्रत्येक शेर आवडला.(अर्थात घोंघावणारा मला झेपणारा शेर नाही)
प्रज्ञा
मंगळ, 07/08/2007 - 18:00
Permalink
सोनालिशी
सहमत आहे.
पुलस्ति
शुक्र, 10/08/2007 - 07:43
Permalink
वा! वा!
प्रकाश शेर मलाही नीट कळला नाही आणि मित्र शेर विशेष आवडला नाही. बाकी सर्व शेर एकदम भिडले! खटला, आभाळ, दुनिया, निरागस.. एक से बढकर एक शेर!!
उदय नावलेकर
मंगळ, 14/08/2007 - 12:59
Permalink
सहमत
अग्दी हेच माजे म्हणणे आहे.
अनंत ढवळे
सोम, 27/08/2007 - 13:18
Permalink
दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अप्रतिम गझल !!
प्रसन्न शेंबेकर
गुरु, 30/08/2007 - 17:33
Permalink
कया बात है??
दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
जिंकलंस रे !एका ओळीत गझल उभी केलीस ! तुझ्यावरून काय ओवाळून टाकू ? जीव फारच छोटी गोष्ट आहे मित्रा!!
प्रसन्न
आकाशवेध
रवि, 02/09/2007 - 13:53
Permalink
अप्रतिम
अप्रतिम हा केवळ एकच शब्द सध्या सुचतोय
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
छान कल्पना आहे.
Shailesh 9422870211
जनार्दन केशव म्...
सोम, 31/12/2007 - 21:35
Permalink
हेच म्हणणे...
या शेरासारखेच म्हणायचे आहे..
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,
" माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
आणि...
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला मला ?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !
दोन्ही शेरात
१. निरागस
२. आभाळ
या शेरातील संवाद भावला...
डॉ. श्रीकृष्ण राऊत
शुक्र, 14/12/2007 - 22:05
Permalink
त्याला `वेगळ्या रंगात' रंगू दे.
प्रिय चित्तरंजन,
सप्रेम अभिनंदन.
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
आपल्यातल्या अशाच `निरागसाच्या'
बोलावण्याची वाट पाहत असावी
आपली गझल.
खेळ मांडला आहेच
त्याला `वेगळ्या रंगात' रंगू दे.
-डॉ.श्रीकृष्ण राऊत
अजब
शनि, 15/12/2007 - 14:31
Permalink
अप्रतिम.
गजल पुन्हा (पुन्हा) वाचली. मतला अत्यंत प्रभावी. गजलेतला प्रत्येक मिसरा थांबून दाद मागणारा (किंवा न मागता मिळवणारा).
अजब
अमित वाघ
शनि, 15/12/2007 - 20:23
Permalink
आवडली...
गझल आवडली... साहेब...
धोंडोपंत
शुक्र, 21/12/2007 - 13:00
Permalink
अप्रतिम
अप्रतिम. अतीव सुंदर. जबरदस्त. प्रत्येक शेर सुंदर, ताकदवान, विलक्षण मोहक.
पंत, आपले अभिनंदन आणि शुभेच्छा.
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
राजगुडे
मंगळ, 29/01/2008 - 12:45
Permalink
ताकदवान कल्पनेला ताकदवान शब्दांचा सुंदर मिलाफ..
ताकदवान कल्पनेला ताकदवान शब्दांचा सुंदर मिलाफ..
पुन्हा पुन्हा वाचाविशी अशी ...
ॐकार
गुरु, 07/02/2008 - 17:15
Permalink
आभाळा, चमकून का निरखतो
दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?
क्या बात है!
आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा
शेर मस्तच आहे! लक्षात राहीलसा.
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
शब्दांनी भावना अगदी नेमकी पकडली आहे.
गझल खूप आवडली!
योगेश वैद्य
शुक्र, 15/02/2008 - 15:42
Permalink
पुन्हा पुन्हा
वाचावी अशी गझल.फारच छान!
अजय अनंत जोशी
शनि, 04/10/2008 - 18:05
Permalink
लव्हली
एक एक शब्द चपखल.
"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा
हे तर फारच छान. बाकीही तितकेच मनाला भिडणारे. नव्याने लिहिणा-यांना उत्तम मार्गदर्शन.
कलोअ चूभूद्याघ्या
तिलकधारीकाका
सोम, 06/10/2008 - 09:32
Permalink
असे करू नये.
चित्तरंजन,
असे करू नये. मुळीच करू नये.
इतकी चांगली गझल करू नये. बाकीच्यांचा आवाका स्पष्ट होतो.
जरा साधी वाटेल अशी गझल करावी.