कुठे म्हणालो?... (अजब)



कुठे म्हणालो मला चांदणे आवडते?
खरे तर मला तुझेच हसणे आवडते...


नकोस सांगू मनातले तू मला तुझ्या
मला तुझा चेहरा वाचणे आवडते...


तुझा हट्ट तू सोडणार नाहीस कधी
मलाही तुझे रुसून बसणे आवडते...


तू नसताना पावसात मी भिजू कसा?
आठवणींच्या सरींत भिजणे आवडते...


एकटाच मी गातो आहे 'अजब' गजल
असे सुरांतच तुला शोधणे आवडते...


गझल: 

प्रतिसाद

नकोस सांगू मनातले तू मला तुझ्या
मला तुझा चेहरा वाचणे आवडते...


तुझा हट्ट तू सोडणार नाहीस कधी
मलाही तुझे रुसून बसणे आवडते..... बहोत खुब!
मतला , मक्ता दोन्ही आवडलेत..
-मानस६

कुठे म्हणालो मला चांदणे आवडते?
खरे तर मला तुझेच हसणे आवडते...

नकोस सांगू मनातले तू मला तुझ्या

मला तुझा चेहरा वाचणे आवडते...

तुझा हट्ट तू सोडणार नाहीस कधी

मलाही तुझे रुसून बसणे आवडते..

क्या बात है. पहिले तिन्ही शेर फार फार आवडले. अगदी सहजसुंदर गझल, अजबराव.

 


नकोस सांगू मनातले तू मला तुझ्या
मला तुझा चेहरा वाचणे आवडते...

वा...वा...वा... मस्त शेर


कुठे म्हणालो मला चांदणे आवडते?
खरे तर मला तुझेच हसणे आवडते...


नकोस सांगू मनातले तू मला तुझ्या
मला तुझा चेहरा वाचणे आवडते...
फारच सुंदर गझल आहे हि. सर्वच शेर आवद्ले.

चेहरा आणि रुसून बसणे हे शेर मस्तच आलेत!!

खूपच सुंदर!!! वा...वा...मतला, दुसरा शेर आणि मक्ता फारच सुंदर. क्या बात है...लिहीत रहा.
...अजून गा रे..अजून गा रे.. अजून कांही...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

अजब,
गझल आवडली.
एकटाच मी गातो आहे 'अजब' गजल
असे सुरांतच तुला शोधणे आवडते...
मक्ता सर्वांत आवडला.
- कुमार