सोबत




(स्थळावर प्रकाशित केलेल्या या गझलेत नवा शेर नुकताच लिहिला (जांभळ्या रंगातील )) 

नको सत्ता, नको दौलत
हवी  केवळ तुझी सोबत


पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत...


नको तो मोह स्पर्शाचा
पुढे जाऊ चुका टाळत 


कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली  'गंमत'


कधी होणार तू माझी ?
-- कळू दे ना तुझेही मत !


'लिही माझ्यावरी कविता'
-पुन्हा आली व्यथा सांगत


- केदार पाटणकर


 


 


 




गझल: 

प्रतिसाद

चहा आणि मत शेर मस्त आलेत!
-- पुलस्ति.

पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत...
वाव्वाव्वा!

नको तो मोह स्पर्शाचा
पुढे जाऊ चुका टाळत
वा!

कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली  'गंमत'
वाव्वा!

कधी होणार तू माझी ?
-- कळू दे ना तुझेही मत !

वाव्वाव्व!

 

कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली  'गंमत'.   हा शेर मस्त आलाय

-मानस६

चहा घेणे विशेष आवडले.गंमतही छान!

व्वा व्वा

वा केदार,
चहा घेऊ, बसू बोलत...- सुंदर.
- कुमार

पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत...
अगदि संवाद साधणारी गझल आहे. सुंदरच.

पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत...

 

मस्त !!

पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत...

नको तो मोह स्पर्शाचा
पुढे जाऊ चुका टाळत 

कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली  'गंमत'      हे शेर खासच.

म्हणतो.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

सुंदर ... सहज...
तुझ्यामाझ्यातली गंमत..
सशक्त परिष्करण . अभिनंदन !!!
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

य़ा गझलेत नवा शेर लिहिला आहे..

'लिही माझ्यावरी कविता'
पुन्हा आली व्यथा सांगत

केदार, चहा पाहिजे यार! कसला शेर आहे! अत्यंत साधे शब्द वापरून किती सॉलीड मुद्दे मांडता येतात याचे उदाहरण! चहा पाहिजे आपल्याला! ग्रेट!

गझल रमणीय आणी चांगली! येथे सांगावेसे वाटते की आपल्याकडे बहारदार गझलकार आहेत हे या गझलेतून निदर्शनास येते.

कटककर,
धन्यवाद. बोला, केव्हा येताय चहा प्यायला ?

रसिक,
धन्यवाद. आपलीही गझल वाचायला आवडेल.