जगणे असते... (अजब)
जगणे असते अपुले आपण जगू तसे
भोवतालचे दिसते आपण बघू तसे...स्वप्ने, कविता, आठवणी अन रोजनिशी
खजिने वाढत जाती आपण भरू तसे...येता-जाता नकळत गाणे गुणगुणतो
गाणे मनात असते आपण म्हणू तसे...पाउस आहे खुणावतो बघ केव्हाचा!
चल ये, आपण पुन्हा एकदा भिजू 'तसे'...नको वसंता, कसली सक्ती झाडांना;
'अजब' तयांना जसे हवे, दे फुलू तसे...
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शनि, 07/07/2007 - 14:30
Permalink
सुंदर
जगणे असते अपुले आपण जगू तसे
भोवतालचे दिसते आपण बघू तसे...
वाव्वा!
येता-जाता नकळत गाणे गुणगुणतो
गाणे मनात असते आपण म्हणू तसे...
वाव्वा!
एकंदरच सुंदर.
प्रदीप कुलकर्णी
शनि, 07/07/2007 - 16:21
Permalink
अप्रतिम...!
अप्रतिम...!
स्वप्ने, कविता, आठवणी अन रोजनिशी
खजिने वाढत जाती आपण भरू तसे...
फारच छान...!
पाउस आहे खुणावतो बघ केव्हाचा!
चल ये, आपण पुन्हा एकदा भिजू 'तसे'...
वा...वा...वा.... 'तसे'...काय ? भिजा...भिजा...!!!
अजब, हे दोन्ही शेर खूप आवडले...लिहीत राहा...शुभेच्छा
पुलस्ति
मंगळ, 10/07/2007 - 01:12
Permalink
वा!
खजिने आणि गाणे शेर खासच!!
- पुलस्ति.
प्रज्ञा
बुध, 11/07/2007 - 16:44
Permalink
सुंदर्
जगणे असते अपुले आपण जगू तसे
भोवतालचे दिसते आपण बघू तसे...
सुंदरच.
जयन्ता५२
गुरु, 12/07/2007 - 11:41
Permalink
सहमत!
अजब,
मस्त! प्रदीपशी सहमत!
जयन्ता५२
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 31/07/2007 - 13:12
Permalink
गझल आवडली
रदीफ चांगला निभावलाय,
पाउस आहे खुणावतो बघ केव्हाचा!
चल ये, आपण पुन्हा एकदा भिजू 'तसे'...
मस्तच आहे...