लागला गळपफास तेव्हा तरतरी श्वासात आली!

गझल
लागला गळपफास तेव्हा तरतरी श्वासात आली!
पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली!!

पोटपाण्याचा निघाला मामला अन् वाकलो मी;
ताठ केली मान तेव्हा नोकरी धोक्यात आली!

वाटल्या लाटा दयाळू, अन् किनाराही कृपाळू;
लागला पत्ता न केव्हा जिंदगी गोत्यात आली!

कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे?
समजण्या आधीच काही पैंजणे पायात आली!

स्वप्न बघण्याचा मलाही लागला इतका लळा की;
ती जरी साक्षात आली, वाटते स्वप्नात आली!

काय मी सांगू कशाने गोडवा गझलेत आला?
वेदनांनी दंश केला, माधुरी शब्दात आली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गझल: 

प्रतिसाद

लागला गळपफास तेव्हा तरतरी श्वासात आली!
पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली!! व्वा व्वा

पोटपाण्याचा निघाला मामला अन् वाकलो मी;
ताठ केली मान तेव्हा नोकरी धोक्यात आली! आवडला ...

रसिक मित्रांनो व मैत्रिणिंनो!
मतल्यात एक टायपिंगची चूक झाली आहे. क्षमस्व!
चुकून गळपफास असे लिहिले गेले. तिथे गळफास असे हवे!
मतला असा आहे.........

लागला गळफास तेव्हा तरतरी श्वासात आली!
पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली!!
...........प्रा.सतीश देवपूरकर

रसिक मित्रांनो व मैत्रिणिंनो!
मतल्यात एक टायपिंगची चूक झाली आहे. क्षमस्व!
चुकून गळपफास असे लिहिले गेले. तिथे गळफास असे हवे!
मतला असा आहे.........

लागला गळफास तेव्हा तरतरी श्वासात आली!
पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली!!
...........प्रा.सतीश देवपूरकर

काय मी सांगू कशाने गोडवा गझलेत आला?
वेदनांनी दंश केला, माधुरी शब्दात आली!

कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे?
समजण्या आधीच काही पैंजणे पायात आली!

खूपच आवडला हा शेर !

Bhannat lai bhannat

धन्यवाद संतोष!

लागला गळफास तेव्हा तरतरी श्वासात आली!
पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली!!

वाह वा..!

कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य
माझे?
समजण्या आधीच काही पैंजणे पायात
आली!

आवडला शेर सुंदर बनली आहे

पहिल्या ओळीत जादा आलेला एक प ही बहुधा अपलोडची चूक आहे. पण पहिले तीनही शेर सुंदर झाले आहेत. छान!