बनेल तारे..

नभात सारे, बनेल तारे..
ठिगळ शिडाला, कुढे किनारे!

पुन्हा पुन्हा आवरू किती मी..
मनातले हे तुझे पसारे

मुळेच कापुन युगे लोटली..
कुठून फुटले नवे धुमारे‌‌‌‍..

उधळण्यास मी तयार आहे..
मिळोत वा ना मिळो खरारे..

“बहर” तुला हे ॠतु कशाला..
बहरण्यासही निमित्त का रे..

-- बहर.

गझल: 

प्रतिसाद

उधळण्यास मी तयार आहे..
मिळोत वा ना मिळो खरारे..

व्वा. मस्त.
आवडली गझल.