चकवा
याद येतो चेहरा हसरा तुझा
ज्यात फसलो, तोच हा चकवा तुझा
नवल आहे, चोर नाही एकही
खूण करतो सारखा खजिना तुझा
स्पर्श दूरच, पाहिले केवळ तुला
केवढा बसला मला झटका तुझा
सर्व ते आकार आकर्षक तुझे
कोणता स्मरणात ठेवावा तुझा
काय तुजपाशी बघायासारखे ?
बहरला गर्दीमुळे रस्ता तुझा
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 03/05/2012 - 09:27
Permalink
वा. स्वच्छ, आकर्षक गझल आहे.
वा. स्वच्छ, आकर्षक गझल आहे. सगळे शेर आवडले. त्यातही
काय तुजपाशी बघायासारखे ?
बहरला गर्दीमुळे रस्ता तुझा
हा विशेष आहे.
चित्तरंजन भट
गुरु, 03/05/2012 - 09:27
Permalink
वा. स्वच्छ, आकर्षक गझल आहे.
वा. स्वच्छ, आकर्षक गझल आहे. सगळे शेर आवडले. त्यातही
काय तुजपाशी बघायासारखे ?
बहरला गर्दीमुळे रस्ता तुझा
हा विशेष आहे.
बेफिकीर
शुक्र, 04/05/2012 - 11:11
Permalink
नवल आहे, चोर नाही एकही खूण
नवल आहे, चोर नाही एकही
खूण करतो सारखा खजिना तुझा
स्पर्श दूरच, पाहिले केवळ तुला
केवढा बसला मला झटका तुझा>>
स्वच्छ, आकर्षक गझल आहे. सगळे शेर आवडले>>
agree to Chitta
कैलास गांधी
शनि, 12/05/2012 - 12:10
Permalink
सर्व ते आकार आकर्षक
सर्व ते आकार आकर्षक तुझे
कोणता स्मरणात ठेवावा तुझा...
मजा आली ...साधी सोपी सुटसुटीत गझल
गंगाधर मुटे
रवि, 27/05/2012 - 18:30
Permalink
सुरेख गझल.
सुरेख गझल.