गाव हा आटपाट स्वप्नांचा
पापणीआड घाट स्वप्नांचा
गाव हा आटपाट स्वप्नांचा
आपली भेट मध्यरात्रीची
बोलबाला पहाटस्वप्नांचा
एकटी रात्र एकटा मीही
आणि रस्ता सुसाट स्वप्नांचा
बंध सोडून रात्र उलगडली
सैल झाला रहाट स्वप्नांचा
रोज काचेपुढे थबकतो मी
पाहतो झगमगाट स्वप्नांचा
ऐकली गोष्ट राजकन्येची
काय हा थाटमाट स्वप्नांचा
नीज मोडू नकोस श्वासांची
तोवरी सार, पाट स्वप्नांचा
थांबला एक श्वास श्वासांवर
अन किती घमघमाट स्वप्नांचा
ऐक एकांत जागतो आहे
ऐक हा किलबिलाट स्वप्नांचा
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 13/06/2011 - 11:11
Permalink
रोज काचेपुढे थबकतो मी पाहतो
रोज काचेपुढे थबकतो मी
पाहतो झगमगाट स्वप्नांचा
वा. एकंदर गझलही आवडली.
अच्युत
रवि, 19/06/2011 - 11:30
Permalink
आपली भेट मध्यरात्रीची बोलबाला
आपली भेट मध्यरात्रीची
बोलबाला पहाटस्वप्नांचा
..छान
एकटी रात्र एकटा मीही
आणि रस्ता सुसाट स्वप्नांचा
..वा वा
बंध सोडून रात्र उलगडली
सैल झाला रहाट स्वप्नांचा
..सुंदर, रहाट आवडला
रोज काचेपुढे थबकतो मी
पाहतो झगमगाट स्वप्नांचा
..सुंदर शेर
ऐक एकांत जागतो आहे
ऐक हा किलबिलाट स्वप्नांचा
..फारच सुरेख शेर