वळवळ केवळ
कोण ऐकतो, कोण समजतो? फुकाच अवघी तळमळ केवळ
झोप रात्रिची उडून जाते, होते पोटी जळजळ केवळ
मनास वाटे व्हावी क्रांती, राहु नये ही चळवळ केवळ
टीव्ही आणिक फेसबुकावर हाय उठवते खळबळ केवळ
रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ
जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ
सामसुमीच्या खुणा सांगती क्षितिजावरती उठेल वादळ
गळत्या पानांमधून कांही उगाच होते सळसळ केवळ
ऊंचऊंच लाव्हा उसळावा स्वस्थ पसरला फुटून कातळ
आत्मतुष्टिचा झरा वाहतो थंडपणाने खळखळ केवळ
टरारणार्या स्नायुंमधुनी बसेल हिसका तुटेल साखळ
सांड बडवले जुवे खेचती, थुंकी गळते घळघळ केवळ
'जन्मलोच तर जगून जाऊ' - कापुरुषांची धडपड निर्बळ
गटारातल्या गांडवळांची अशीच असते वळवळ केवळ
***
गझल:
प्रतिसाद
तन्मय
सोम, 06/06/2011 - 12:03
Permalink
रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न
रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ
जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ
अप्रतिम शेर ................
शोभातेलन्ग
बुध, 15/06/2011 - 10:42
Permalink
शेवतलला शेर मस्त व्वा व्वा
शेवतलला शेर मस्त व्वा व्वा
शाम
शुक्र, 17/06/2011 - 23:06
Permalink
रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न
रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ
जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ
...मस्त
अच्युत
रवि, 19/06/2011 - 11:26
Permalink
रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न
रस्त्यावरचे रक्त पाहुनि अता न येते कधीच भोवळ
जाताजाता चुकचुक थोडी, थोडी उरते मळमळ केवळ
या ओळी बराच काळ लक्षात रहाव्यात अशा आहेत, सुरेख
अच्युत
रवि, 19/06/2011 - 11:27
Permalink
सामसुमीच्या खुणा सांगती
सामसुमीच्या खुणा सांगती क्षितिजावरती उठेल वादळ
गळत्या पानांमधून कांही उगाच होते सळसळ केवळ
हे ही छानच
supriya.jadhav7
गुरु, 30/06/2011 - 20:52
Permalink
संपूर्ण गझल्....एक एक शेर
संपूर्ण गझल्....एक एक शेर खिळवून ठेवतो....
अनेकदा वाचली.....
नि:शब्द.................!!!
बेफिकीर
शुक्र, 01/07/2011 - 00:14
Permalink
सर्वांशी सहमत! सुंदर गझल!
सर्वांशी सहमत!
सुंदर गझल!
(अवांतर - चौथ्या शेरात गळत्या पानांचा पहिल्या मिसर्यात काहीसा घरोबा असायला हवा होताका?)
खूप खूप आवडली ही गझल, सात मतल्यांची!
नावीन्यपूर्णही आहेच!
-'बेफिकीर'!