हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले
हवे हवे ते घडतच नाही, घडू नये ते घडून गेले
सावरले मी किती मनाला, जडू नये ते जडून गेले
नाईलाज तरी किती म्हणावा,सोशीक कणखर होण्याला
सांत्वनातले रुमाल सारे सडू नये ते सडून गेले
तसे इशारे कळले होते तुला सुधा अन् मला सुधा पण
नाव तुझे ओठातच माझ्या दडू नये ते दडून गेले
नवसालाही पावत होता तरी उपाशी विठूच होता
भक्त कुठे ही नव्हता ! पाया पडू नये ते पडून गेले
विश्वासाची बात नको रे ! गळा कापतो केसाने
काय सांगू मी ! कलीयुगीया नडू नये ते नडून गेले
सोपे साधे कधीच नसते गणीत किचकट जगण्याचे
सुटेल म्हणुनी गुंतुन गेलो अडू नये ते अडून गेले
मयुरेश साने .. दि ३०- मे-११
गझल:
प्रतिसाद
विद्यानंद हाडके
बुध, 01/06/2011 - 07:52
Permalink
तसे इशारे कळले होते तुला सुधा
तसे इशारे कळले होते तुला सुधा अन् मला सुधा पण
नाव तुझे ओठातच माझ्या दडू नये ते दडून गेले ......... सहीच
सोपे साधे कधीच नसते गणीत किचकट जगण्याचे
सुटेल म्हणुनी गुंतुन गेलो अडू नये ते अडून गेले ......... बहोत अच्छे मयुरेश वाह
awdhutkumar
मंगळ, 07/06/2011 - 11:33
Permalink
खूप सु॑दर !
खूप सु॑दर !