गावाला आलो की.....

गावाला आलो की मिळते सावळ कांती गालाला
चुंबन देते बहुदा काळी माती गोर्‍या पोराला

म्हातारा झाल्याने बाबा बोलत नाही मोठ्याने
पण थकलेल्या वाणीचाही धाकच आहे आम्हाला

कष्टाचा पोवाडा बिल्कुल सांगावा लागत नाही
इतक्या आवेगाने त्याची बंडी भिडते घामाला

मुलगा करतो चिंता ह्याची मसणाच्याही वाटेवर
बक्कळ पैसा गेला माझा बाबाच्या ह्या दुखण्याला

भावाभावामध्ये झाली इर्षा सवते होण्याची
आई चिंतित आहे की ती जाते कुठल्या वाट्याला
---------------------------------
विजय दिनकर पाटील 'कणखर'

गझल: 

प्रतिसाद

मुलगा करतो चिंता ह्याची मसणाच्याही वाटेवर
बक्कळ पैसा गेला माझा बाबाच्या ह्या दुखण्याला

भावाभावामध्ये झाली इर्षा सवते होण्याची
आई चिंतित आहे की ती जाते कुठल्या वाट्याला

शेवट्चे तीनही शेर छान...
वरील दोन खासच

मुलगा करतो चिंता ह्याची मसणाच्याही वाटेवर
बक्कळ पैसा गेला माझा बाबाच्या ह्या दुखण्याला

भावाभावामध्ये झाली इर्षा सवते होण्याची
आई चिंतित आहे की ती जाते कुठल्या वाट्याला

शेवट्चे तीनही शेर छान....
वरील दोन खासच