मैफील आज जमली -

मैफील आज जमली , पण रंग नाहि भरला
नादात मी तिच्या तो कोठेतरी विसरला !

मी देवळात दमलो देवीस शोधताना
माता घरात दिसली दारात जीव हसला !

शोधीत कस्तुरीच्या गंधास दूर फिरलो -
शेजारधर्म नाते जपण्यात तो मिसळला !

पाऊस पाहण्या मी दारी उभा जरासा ;
गळक्या छतातुनी तो पाठीवरी बरसला !

पाठीत वार केला तो मित्र मीच जपला
वैरी समोरुनी का जाता उगाच हसला ?

गझल: 

प्रतिसाद

पाऊस पाहण्या मी दारी उभा जरासा ;
गळक्या छतातुनी तो पाठीवरी बरसला !

छान!!