घोळ


कोरडे

ओहोळ आता
मधु विना मोहोळ आता


एक भाकर,लाख तोंडे
रोजचा हा घोळ आता


थाप दारावर कुणाची?
गप्प गल्लीबोळ आता


देश काळोखी बुडाला
थंड का 'दाभोळ' आता?

'ते' हजारो जहर प्याले
'सदनि' गदारोळ आता!


'चूक ह्याची ,चूक त्याची'
 कागदी हिंदोळ आता



(जयन्ता५२)



गझल: 

प्रतिसाद

थाप दारावर कुणाची?
गप्प गल्लीबोळ आता
अप्रतिम...!


देश काळोखी बुडाला
थंड का 'दाभोळ' आता?
वा...वा...!

   सहमत आहे!

गझल खूप छान आहे.

थाप दारावर कुणाची?
गप्प गल्लीबोळ आता
वा! पार आवडला.

वा जयंतराव,
सुंदर गझल... सगळेच शेर आवडले. छोटी बहर छान जमली आहे.
मतला, 'थंड का दाभोळ आता'ही.
एक भाकर,लाख तोंडे
रोजचा हा घोळ आता .. सुंदर.
- कुमार

सगळे शेर आवडले !
मस्त उतरलिये गजल !