कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?
किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे
कधी भाट होई सख्या चेहर्यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
.
. गंगाधर मुटे
--------------------------------------------
गझल:
प्रतिसाद
प्रसाद लिमये
गुरु, 21/04/2011 - 17:48
Permalink
छान जरा गंध नाही मुळी
छान
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
ही ओळ खूप आवडली
गंगाधर मुटे
रवि, 11/09/2011 - 08:35
Permalink
१ एप्रिल २०११ ते १५ मे २०११
१ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचा आज दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही कविता/गझल प्रथम क्रमांक विजेता ठरली आहे.
दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या एका शेतकरी माणसाची कविता/गझल पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
त्याबद्दल माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना, ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना, तसेच
माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना मी मन:पूर्वक अभिवादन करतो.
- गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------
प्रसाद लिमये
रवि, 11/09/2011 - 15:43
Permalink
हार्दिक अभिनंदन :)
हार्दिक अभिनंदन :)
बेफिकीर
गुरु, 15/09/2011 - 00:34
Permalink
many congrats Mr Mute! :-)
many congrats Mr Mute! :-)
बेफिकीर
गुरु, 15/09/2011 - 00:36
Permalink
परी घेतले सोंग ज्याने निजेचे,
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!>>>
true, very true!
गंगाधर मुटे
बुध, 21/09/2011 - 11:17
Permalink
मन:पूर्वक धन्यवाद बेफ़िकीरजी.
मन:पूर्वक धन्यवाद बेफ़िकीरजी.