नामानिराळे
भोगणारे भोगुनी,नामानिराळे
पाप सारे ते,भल्या माथी झळाळे
चेहर्यावर ते किती,त्यांच्या मुखोटे
हे बरे तुज,जे खरे खोटे कळाले
दोर जेव्हा कापले,मी परतण्याचे
सोबती अर्ध्यातुनी,मागे पळाले
त्या पुरामागून, आली वादळेही
सांत्वनाचे पत्र,ते आता मिळाले
काय तू,आलीस ती ही या अवेळी
काळजाचे पीळही, आता जळाले
विसरलो सारेच पाढे,जीवनाचे
शेवटी जमवू कसे हे ठोकताळे
फोन...9821273412
E-mail..sanhita44@yahoo.in
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
शुक्र, 15/04/2011 - 15:31
Permalink
ह्या रचनेत अलामत पाळली गेलेली
ह्या रचनेत अलामत पाळली गेलेली नाही.
संतोष कसवणकर
शनि, 23/04/2011 - 17:36
Permalink
आपल्या सुचनेची नोंद घेतली
आपल्या सुचनेची नोंद घेतली आहे. धन्यवाद!