खरे ना?
आपलेही स्वप्न होते - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?
मी म्हणालो - जायचे आहे जरासे
चालली होतीस तूही - हे खरे ना?
तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?
लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे ना?
कोण रडतो तो रिकाम्या गोलघुमटीं?
दु:ख त्याचे अंतरी आहे खरे ना?
आंधळ्या तुजला 'विसू'रे मोरपंखीं -
फक्त दिसतो रंग काळा - हे खरे ना?
Taxonomy upgrade extras:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
रवि, 10/06/2007 - 01:08
Permalink
धन्यवाद...!
१) आपण इतक्या लांबून ताजी ताजी, वाफाळलेली दाद दिलीत...धन्यवाद...!
२) तुमच्या `गझले`विषयी ः कल्पना छान आहेत....पण यमके ...? असा `प्रयोग ` कशासाठी...?
संपादक
सोम, 11/06/2007 - 10:11
Permalink
चांगल्या, सशक्त कल्पना
चांगल्या, सशक्त कल्पना आल्या आहेत. पण ही गझल नसल्याने नाइलाजाने विचाराधीन विभाग हलविण्यात आली आहे.
चित्तरंजन भट
सोम, 11/06/2007 - 10:15
Permalink
विसुनाना
ही गझल नाही. (हे तुम्हालाही माहीत असावे)
तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?
लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे ना?
पण हे जे काही आहे ते आवडले.