खरे ना?




आपलेही स्वप्न होते - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
चालली होतीस तूही - हे खरे ना?


तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?


लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे ना?


कोण रडतो तो रिकाम्या गोलघुमटीं?
दु:ख त्याचे अंतरी आहे खरे ना?


आंधळ्या तुजला 'विसू'रे मोरपंखीं -
फक्त दिसतो रंग काळा - हे खरे ना?


 


 




Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

 
१) आपण इतक्या लांबून ताजी ताजी, वाफाळलेली दाद दिलीत...धन्यवाद...!
२) तुमच्या  `गझले`विषयी ः  कल्पना छान आहेत....पण यमके ...?   असा  `प्रयोग ` कशासाठी...?  
 

चांगल्या, सशक्त कल्पना आल्या आहेत. पण ही गझल नसल्याने नाइलाजाने विचाराधीन विभाग हलविण्यात आली आहे.

ही गझल नाही. (हे तुम्हालाही माहीत असावे) 
तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?

लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे ना?

पण हे जे काही आहे ते आवडले.