...देऊ नये !
...देऊ नये !
आसवांना ओघळू देऊ नये !
दुःख दुनियेला कळू देऊ नये !तोल जातानाच का हे जाणवे...
...तोल केव्हाही ढळू देऊ नये !एकटी सोडू नये संधी कधी
दूर संधीला पळू देऊ नये !खूप झाले एवढे केले तरी -
फूल फांदीचे गळू देऊ नये !शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !वेळ गेलेली पुन्हा येईल का ?
वेळ आलेली टळू देऊ नये !!हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!`मावळू दे सूर्यही अन् चंद्रही...
मात्र आशा मावळू देऊ नये !शक्य हे प्रेमात आहे का कधी...?
- जीव मी माझा जळू देऊ नये...!ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !- प्रदीप कुलकर्णी
गझल:
प्रतिसाद
विसुनाना
रवि, 10/06/2007 - 00:52
Permalink
आवडली.
गझल फार आवडली.
हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !
ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
-खास!
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
-एकदम मस्त! (इथे 'अर्थाला'-एकवचनी का वापरले नाही?)
मतलाही खूप आवडला.
इतकी 'ळू' ने संपणारी क्रियापदे समर्पकपणे वापरणे हे प्रचंड अवघड!
प्रदीप कुलकर्णी
रवि, 10/06/2007 - 16:45
Permalink
धन्यवाद विसुनाना...
धन्यवाद...
..................................
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
-एकदम मस्त! (इथे 'अर्थाला'-एकवचनी का वापरले नाही?)
....कारण, वरच्या ओळीत `शब्द` हा शब्द अनेकवचनी वापरला आहे म्हणून !
अनेक शब्द खाणाखुणा करतील....मात्र, त्या त्या शब्दांच्या अर्थांना चळू देऊ नये...शब्द मोहात पाडण्याचा प्रयत्न करतील, पण त्या मोहाला अर्थांना बळी पडू देऊ नये....
चित्तरंजन भट
सोम, 11/06/2007 - 00:25
Permalink
वा!
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
वा!
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
वाव्वा!!!
विसुनानांसारखीच गझल फार आवडली.
प्रज्ञा
सोम, 11/06/2007 - 12:37
Permalink
सुंदर
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
अग्दी मनातल. सुंदर आहे गजल.
उदय नावलेकर
सोम, 11/06/2007 - 12:57
Permalink
सुंदर
संपुर्ण गझलच पर्वणी आहे.
पुलस्ति
सोम, 11/06/2007 - 21:10
Permalink
छानच
पाय, अर्थ, फूल, हाक आणि प्रेम - शेर खूपच आवडले!!
-- पुलस्ति.
शैलेंद्र गुरव
शनि, 23/06/2007 - 12:45
Permalink
छान
शैलु गुरव
शक्य हे प्रेमात आहे का कधी...?
- जीव मी माझा जळू देऊ नये...!
ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
फारच आवडलं.
जयन्ता५२
मंगळ, 26/06/2007 - 16:39
Permalink
उत्तम!
खूप झाले एवढे केले तरी -
फूल फांदीचे गळू देऊ नये !
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !
हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !
कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!`
मावळू दे सूर्यही अन् चंद्रही...
मात्र आशा मावळू देऊ नये !
----वा वा प्रदीप्!केवळ अप्रतिम!जिओ.
जयन्ता५२
जयन्ता५२
कुमार जावडेकर
मंगळ, 26/06/2007 - 21:33
Permalink
वा! वा! वा!
प्रदीप,
अप्रतिम गझल... प्रत्येक शेर सुंदर आहे.
आसवांना ओघळू देऊ नये !
दुःख दुनियेला कळू देऊ नये ! - किती सहज्-सुंदर!!!!
तोल, संधी, फूल ... प्रत्येक शेर वाचतानाच भिडत गेला.
हाक देताना हळू देऊ नये !! - सुंदर!!!!
- कुमार
कुशल
रवि, 02/09/2007 - 14:57
Permalink
जगण्याचं सार....!
गझल फार आवडली.
जगावं कसं याचं उत्तम चित्रण झालं आहे.
तरी खालील ओळींचा अर्थ कळला नाही.
कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!`
मानस६
रवि, 02/09/2007 - 17:16
Permalink
तोल जातानाच का हे जाणवे...
तोल जातानाच का हे जाणवे...
...तोल केव्हाही ढळू देऊ नये !..
खूप झाले एवढे केले तरी -
फूल फांदीचे गळू देऊ नये !
शब्द हे करतीलही खाणाखुणा
मात्र अर्थांना चळू देऊ नये !..ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!... वा!नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !..प्यार को प्यार हे रहने दो ,कोई नाम ना दो.. ह्या ओळी आठवल्या
अतिशय अर्थपूर्ण, भावपूर्ण शेरांनी सजलेली गझल ..उत्तमच
-मानस६
अजब
सोम, 03/09/2007 - 15:32
Permalink
वा!
गजल फारच आवडली. माझं मतही वरील मतांसारखंच...
अजब
संतोष कुलकर्णी
गुरु, 06/09/2007 - 19:06
Permalink
ओ हो !!!
वा, वा, प्रदीपदा,
क्या बात है! अख्खं अनुभवविश्व उभं केलंत!!! कोणकोणत्या शेराबद्दल लिहावंं! ये दिल मांगे मोअर !!! एवढंच म्हणतो मातद्या.अनेक गझला अजून येवू द्या.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०
मनिशा
रवि, 20/04/2008 - 12:00
Permalink
उत्तम!
प्रदीप्,तुमची गझल सहज सुन्दर असते.
मयूर
मंगळ, 22/04/2008 - 09:37
Permalink
अत्युत्तम!
सगळेच शेर सही. त्यातही
'हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !
कायदा होईलही मागे-पुढे...
`पावसाला कोसळू देऊ नये !!'
हे दोन जाम आवडले.
योगेश वैद्य
बुध, 23/04/2008 - 19:04
Permalink
वा वा वा
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
हा शेर खासच!
संपूर्ण गझल आवडली प्रदीपराव!
बापू दासरी
मंगळ, 29/04/2008 - 16:54
Permalink
छान्
सर्व शेर खास : बापू दासरी
आरती सुदाम कदम
मंगळ, 21/04/2009 - 16:24
Permalink
काय बोलाव यावर????
अप्रतिम.....अर्थात नेहमीसारखच....
आनंदयात्री
शुक्र, 24/04/2009 - 10:24
Permalink
हृदय मागे
हृदय मागे राहिले असले तरी
पाय माघारी वळू देऊ नये !
ओ कुणी देणारही नाही, तरी -
हाक देताना हळू देऊ नये !!
नाव नात्याला हवे का नेहमी...?
प्रेम शब्दांनी मळू देऊ नये !
वावावा....
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!