ताटाखालची मांजरे


वेगवेगळ्या धर्मांचे वेगळे रंग झाले
सारख्याच माणसांचे आगळे ढंग झाले


आज राहिला न गाभा-यात माझा विठोबा
मोजण्यात नोट सारे मंदिरी दंग झाले


काय बोलणार ताटाखालची मांजरे ही?
बोललो जरा कुठे मी आणि वादंग झाले!


भाकरी न भेटली त्यांना कुणा काय वाटे?
ती रिती जरी तिजोरी, 'हे' खिसे तंग झाले


शोधतो अजूनही मी भूतकाळास माझ्या
काय मी करू सखे? स्वप्नही असे भंग झाले...


गझल: 

प्रतिसाद

गझल छान. ताटाखालची मांजरे आवडली. वृत्त वेगळे आहे. वेगळीच लय. किंबहुना मला लयीत म्हणताना त्रास होतो आहे.

जो पर्यंत वृत्तांवर हुकुमत येत नाही तोवर प्रचलित वृत्तांमधेच लिहावे.
मांजरे, विठोबा आवडले.  

शीर्षक मस्त आहे !
सहजता वाखाणण्याजोगी आहे !
मस्त गजल !

आज राहिला न गाभा-यात माझा विठोबा
मोजण्यात नोट सारे मंदिरी दंग झाले
शेर भिडला.