जरी वाटेल माझे बोलणे

जरी वाटेल माझे बोलणे खोटे तुला
हृदय माझे कधी नव्हते दिले उसने तुला

मनाशी रोजची हितगूज होती चालली
तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला

जगाशी भांडल्याने आपले होते हसे
जगालाही मजा येते जशी येते तुला

जसा हा चंद्र आकाशी बदलतो वागणे
तसे आकाश त्या बदल्यात बोलवते तुला ?

महागाई किती प्रेमातही बघ वाढली
तरी स्वस्तात माझा भरवसा आहे तुला

मला तू सोडले आहेस नाही खंत ही
दिले आहे जगाशी बांधुनी नाते तुला

मला सर्वांपुढे तू टाळते आहेस पण...
मला माहीत आहे कोण आवडते तुला

गझल: 

प्रतिसाद

मला तू सोडले आहेस याची खंत नाही

ही ओळ
मला तू सोडले आहेस नाही खंत ही
अशी वाचावी

मनाशी रोजची हितगूज होती चालली
तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला

जगाशी भांडल्याने आपले होते हसे
जगालाही मजा येते जशी येते तुला

मला सर्वांपुढे तू टाळते आहेस पण...
मला माहीत आहे कोण आवडते तुला

वा. स्वरयमकांची गझल एकंदर छानच झाली आहे. विशेषतः ओळींचा सहज-साधेपणा फार आवडला.

मला सर्वांपुढे तू टाळते आहेस पण...
मला माहीत आहे कोण आवडते तुला

वा... चांगली झाली आहे गझल...

मनाशी रोजची हितगूज होती चालली
तुझ्याशी बोललो मी वाटले होते तुला

व्वा...

चित्तरंजन, वैभव, कैलास धन्यवाद!

छान गझल. सहजसुंदर शेर.

छान गझल!
:)

गंगाधर, आनंदयात्री धन्यवाद!

गझल आवडली.

खुप आवडली गझल.

हितगुज व शेवटचा शेर....दोन्ही आवडले.

मला माहीत आहे कोण आवडते तुला..वा !