चाहुलीची तुझ्या चमक...
चाहुलीची तुझ्या चमक बोलायची
येत आहेस तू सडक बोलायची
भेटुनी फायदा काय आहे तिला
पहिजे ना मना धमक बोलायची
ओठ रक्ताळले लाल झाला गळा
काय इतकी गरज कडक बोलायची
बोल केव्हातरी मुक्त वार्यापरी
सोड आखिव सवय सुबक बोलायची
जे तुझ्या अंतरी तेच माझ्या मनी...
व्हायला लागली धडक बोलायची
खूण साधी पुरे शाहण्याला कळे
काय आहे गरज ठळक बोलायची
- वैभव देशमुख
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
मंगळ, 15/02/2011 - 15:15
Permalink
चाहुलीची तुझ्या चमक
चाहुलीची तुझ्या चमक बोलायची
येत आहेस तू सडक बोलायची
छानच...
ओठ रक्ताळले लाल झाला गळा
काय इतकी गरज कडक बोलायची
मस्त.
जे तुझ्या अंतरी तेच माझ्या मनी...
व्हायला लागली धडक बोलायची
वाव्वा.. एकंदरच गझल चांगली, सुबक. आवडली.
बेफिकीर
मंगळ, 15/02/2011 - 19:00
Permalink
सहमत आहे. पण येथे मागे
सहमत आहे. पण येथे मागे पुणेकरांनी एक लिहीले होते त्याची आठवण झाली. सुबक, धडक, चमक हे शब्द उच्चारताना 'लगा' अशा नैसर्गीक वजनात उच्चारले जातात सहसा! या गझलेत 'गाल' अशा वजनात उच्चारताना पटकन उच्चारावे लागत आहेत.
चाहुलीची तुझ्या चमक बोलायची
येत आहेस तू सडक बोलायची
भेटुनी फायदा काय आहे तिला
पहिजे ना मना धमक बोलायची
ओठ रक्ताळले लाल झाला गळा
काय इतकी गरज कडक बोलायची
बोल केव्हातरी मुक्त वार्यापरी
सोड आखिव सवय सुबक बोलायची
जे तुझ्या अंतरी तेच माझ्या मनी...
व्हायला लागली धडक बोलायची
खूण साधी पुरे शाहण्याला कळे
काय आहे गरज ठळक बोलायची
सगळेच आवडले म्हणून सगळेच पेस्ट केले.
धन्यवाद!
विद्यानंद हाडके
गुरु, 17/02/2011 - 13:18
Permalink
बोल केव्हातरी मुक्त
बोल केव्हातरी मुक्त वार्यापरी
सोड आखिव सवय सुबक बोलायची
क्या ब्बात है वैभव व्वा....
कैलास
गुरु, 17/02/2011 - 13:21
Permalink
सुंदर. :)
सुंदर. :)
कैलास गांधी
बुध, 04/04/2012 - 13:40
Permalink
चाहुलीची तुझ्या चमक
चाहुलीची तुझ्या चमक बोलायची
येत आहेस तू सडक बोलायची
छानच...
ओठ रक्ताळले लाल झाला गळा
काय इतकी गरज कडक बोलायची
मस्त.
सगळेच आवडले!!!!